The lure of 9 percent returns every month pune crime news | दरमहा 9 टक्के परतावा देण्याचे आमिष: गुंतवणूकदारांची तीन कोटी ४८ लाख रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल – Pune News

0

[ad_1]

त्मनिर्भर काॅन्सेप्टस इंडिया प्रा.लि. कंपनीचे संचालक व एजंट यांनी एकत्रितरित्या मिळून संगनमत करुन एकूण ४१ गुंतवणूकदार यांची तब्बल तीन काेटी ४८ लाख ९२ हजार रुपयांची आर्थिक फसवणुक केल्याचा प्रकार घडला अाहे. याप्रकरणी चार आराेपी विराेधात बंडगार्डन पाेल

.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी कुश चतुर्वेदी, रचना हरिश श्रींगे (रा. अमित काेलेरी, उंड्री,पुणे), मंजुशा शशीकांत क्षिरसागर (रा.बाेपाेडी,पुणे) व शशिकांत क्षिरसागर (रा. बाेपाेेडी,पुणे) यांचे विराेधात भादंवि कलम ४२०, ४०६, ४०९, ३४ व महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधीचे संरक्षण ३ व ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना १/१/२०२२ ते १/१/२०२४ यादरम्यान घडलेली आहे. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारनुसार आराेपी कुश चतुर्वेदी याने आत्मनिर्भर काॅन्सेप्टस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सुरुवात केली. या कंपनीत आराेपी रचना श्रींगे, मंजुशा क्षिरसागर, शशीकांत क्षिरसागर हे एजंट म्हणून काम पाहत हाेते.

त्यांनी गुंतवणुकदार यांना कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहिना ८ ते ९ टक्के दराने परतावा देण्याचे अमिष दाखवले तसेच साखळी पध्दतीने हे काम वाढवून इतर गुंतवणुकदार मिळवल्यास अधिक नफा मिळेल असे देखील सांगण्यात आले. त्यानुसार वेळाेवेळी तक्रारदार व इतर ४० गुंतवणुकदार यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यांच्याकडून गुंतवणुक म्हणून रक्कम स्विकारुन आराेपींनी त्यांचेकडे गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यावर ८ ते ९ टक्के परतावा देताे असे अमिष दाखवून आराेपींनी गुंतवणुकीची मुद्दल रक्कम तीन काेटी ४८ लाख ९२ हजार रुपये व त्यावरील परतावा गुंतवणुकदार यांना न देता सदर रकमेचा स्वत:च्या फायद्यासाठी अपहार करुन तिचा वापर करत आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी बंडगार्ड पाेलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक एस जानराव पुढील तपास करत आहे.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here