आंघोळीच्या वेळी लघवी होते? अमेरिकन डॉक्टरांनी दिला ‘या’ आजाराचा इशारा; महिलांनी सावधगिरी बाळगावी

0

[ad_1]

तुम्हाला आंघोळ करताना लघवी होते का? तर तुम्हाला ही समस्या असेल किंवा अजाणतेपणे तुमच्या आरोग्याशी खेळत आहात, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. आंघोळ करताना लघवी करणे ही एक धोकादायक सवय आहे. यामुळे तुम्हाला वारंवार आंघोळीला गेल्यावर लघवी होऊ शकते. या सवयीमुळे तुमच्या मूत्रपिंडांचं मोठं नुकसान करत आहात. अमेरिकन युरोगायनॅकॉलॉजिस्ट डॉ. टेरेसा इरविन यांनी ज्या लोकांना ही सवय त्यांना गंभीर इशारा दिलाय. ते म्हणाले की, 60 ते 80 टक्के लोकांना ही सवय असून त्यांच्या शरीरासाठी हे घातक आहे. 

लघवी पूर्णपणे स्वच्छ नसते, त्यात काही धोकेदेखील असण्याची शक्यता आहे. जर एखाद्याला यूटीआयची समस्या असेल तर त्याच्या लघवीमध्ये जास्त बॅक्टेरिया असल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. ज्या महिला, शॉवरमध्ये उभे राहून लघवी करताना त्यांचे पेल्विक फ्लोर स्नायू कमकुवत असण्याची शक्यता आहे. यामुळे मूत्र गळतीची समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे 

पाण्याचा आवाज आणि लघवीचा संबंध?

ते म्हणतात की, जेव्हा तुम्ही आंघोळ करताना लघवी करता तेव्हा तुमचा मेंदू वाहत्या पाण्याचा आवाज तुम्हाला यूरिन करण्यास प्रवृत्त करतो. यानंतर तुमचा मेंदू पाण्याच्या आवाजासोबत काम करू लागतो. म्हणजेच, जेव्हा तुम्ही हात धुता, आंघोळ करता किंवा भांडी धुता तेव्हा मूत्राशय पाण्याचा आवाज ऐकतो आणि तुम्हाला लघवी होते. दीर्घकाळात, ही सवय तुमच्या लघवीवरील नियंत्रण बिघडू शकते, ज्यामुळे तुम्हाला वारंवार शौचालयात जावं लागतं. 

मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका

काही डॉक्टरांचा असा विश्वास आहे की, जर महिलांनी आंघोळ करताना उभे राहून लघवी केली तर त्यांना यूटीआय (मूत्र संसर्ग) किंवा मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका अधिक असतो. पुरुषांच्या बाबतीत, त्यांची प्रोस्टेट ग्रंथी लघवी करताना मूत्राशयाला आधार देते, मात्र महिलांना असा कोणताही नैसर्गिक आधार नसतो.

मूत्रमार्गात अडथळा येण्याचा धोका!

जेव्हा महिला उभे राहून लघवी करतात तेव्हा त्यांच्या पेल्विक फ्लोर स्नायूंवर जास्त दबाव येतो, ज्यामुळे त्यांना त्यांचे मूत्राशय पूर्णपणे रिकामे करता येत नाही. मूत्र शिल्लक राहिल्याने, ज्याला वैद्यकीय भाषेत मूत्र धारणा म्हणतात, अनेक आरोग्य समस्या उद्भवतात. खरंतर, महिलांचे शरीर उभे राहून लघवी करण्यासाठी बनवले गेले नाही. यामुळे मूत्राशय व्यवस्थित रिकामे होत नाही. 

त्वचेच्या संसर्गाचा धोका!

शॉवरमध्ये लघवी करण्याचा आणखी एक धोका म्हणजे जर तुमच्या शरीराच्या खालच्या भागात कोणताही जखम असेल तर लघवीमध्ये असलेले बॅक्टेरिया त्या जखमेला संक्रमित करू शकतात. पण, हा धोका फार मोठा नाही कारण आंघोळ करताना, शॉवरचे पाणी मूत्र धुवून टाकतं. 

आंघोळीत लघवी करणे ही एक वाईट सवय आहे. यामुळे मेंदूला चुकीचे सिग्नल मिळू लागतात आणि लघवी नियंत्रित करण्यात अडचण येण्याची दाट शक्यता आहे. महिलांना यामुळे जास्त नुकसान होऊ शकतं जसे की मूत्रमार्गात अडथळा, संसर्ग आणि मूत्रपिंडांवर परिणाम. म्हणून, ही सवय सोडून देणे आणि गरज असेल तेव्हाच शौचालयाचा वापर करणे चांगले मानले गेले आहे. 

(Disclaimer –  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)  



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here