[ad_1]
नागपूर विभागाचा दहाव्या वर्गाचा निकाल आज, मंगळवारी दुपारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यात भंडारा जिल्ह्याचा८८.४८ टक्के निकाल लागला असून, यावेळीही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९२ टक्के तर, मुलांचा निकाल ८३ टक्के लागला आहे.
.
यावर्षी दहाव्या वर्गाची परीक्षा फेब्रुवारी -मार्च महिन्यात घेण्यात आली. भंडारा जिल्ह्यातून दहाव्या वर्गाच्या परीक्षेकरिता जिल्ह्यातून १५,३७६ मुलामुलींनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,३२४ जणांनी परीक्षा दिली. आज लागलेल्या निकालात १३,४४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ६६२६ मुले आणि ६८१६ मुलींचा समावेश आहे. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८३.१७ टक्के असून मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.६३ टक्के आहे.
दहाव्या वर्गाच्या परीक्षेत एकूण २८४ शाळांचे विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३८ विद्यालयांचा १०० टक्के निकाल लागला आहे. तसेच ११० विद्यालयांचा निकाल ९० ते ९९ टक्के लागला, तर ६६ विद्यालयांचा निकाल ८० ते ९० टक्के दरम्यान लागला आहे.
गुणवत्ता श्रेणीत २ हजार २२७ मुले
दहाव्या वर्गाच्या परीक्षेत २ हजार २२७ मुलेमुली गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच प्रथम श्रेणीत ४ हजार २८१, तर ४९८५ जणांनी द्वितीय श्रेणीत परीक्षा उत्तीर्ण केली आहे, १ हजार ८५४ जण पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी एकूण १३ हजार ३४७ विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
जिल्ह्यातून लाखनी तालुका अव्वल
भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यांमधून लाखनी तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९३.३९ टक्के लागला आहे. त्यानंतर पवनी तालुका ९१.७७ टक्के, भंडारा तालुका ९१.२४ टक्के, मोहाडी तालुका ८९.५९ टक्के, साकोली तालुका ८९.५४ टक्के, तुमसर तालुका ८३.१३ टक्के आणि लाखांदूर तालुका ७९ टक्के निकाल लागला आहे.
जिल्हा परिषद जकातदार विद्यालय भंडारा येथील एसएससी बोर्ड परीक्षेत 84 पैकी 69 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेचा निकाल 82.14 टक्के आहे. शाळेतून प्रणोती राजेश सेलोकर ही विद्यार्थीनी 96.60 टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. धवल दिपक फुलबांधे हा विद्यार्थी 87.60 टक्के घेऊन द्वितीय आला. तर अथर्व अनिल बिजवे याने 87.60 टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला आहे.
[ad_2]