[ad_1]
औंढा नागनाथ शिवारात खांडेश्वरीच्या माळावर एका व्यक्तीचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह मंगळवारी ता. १३ रात्री साडेसात वाजता आढळून आला आहे. औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी परिसरातील बेपत्ता व्यक्तीची
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर खांडेश्वरीचा माळ आहे. आज रात्री सात वाजण्याच्या सुमारास माळरानातील एका झाडाला एका व्यक्तीचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे निरीक्षक जी. एस. राहिरे, उपनिरीक्षक माधव जिव्हारे, उपनिरीक्षक शेख खुद्दूस, जमादार वसीम पठाण, ज्ञानेश्वर गोरे, संदीप टाक, ओंकारेश्वर रांजणीकर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान, घटनास्थळावर एका झाडाला एका व्यक्तीचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आली. पोलिसांनी मयताची ओळख पटवण्यासाठी घटनास्थळाच्या परिसरात पाहणी केली. मात्र, तेथे काहीही आढळून आले नाही. त्यानंतर पोलिसांनी सदर मृतदेह खाली काढून उत्तरीय तपासणीसाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. सदर व्यक्तीने मागील तीन ते चार दिवसांपूर्वी गळफास घेतलेला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, सदर मयताची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी परिसरातील बेपत्ता व्यक्तीची माहिती घेण्यास सुरवात केली असून मृतदेह सापडल्याची माहिती जिल्हाभरातील सर्व पोलिस ठाण्यांना कळवली आहे. मयताच्या हातावर नाव गोंदलेले असून सदर नांव अस्पष्ट असल्याने ओळख पटवणे कठीण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे औंढा नागनाथ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयताची ओळख पटल्यानंतरच आत्महत्या कि खून हे स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
[ad_2]