[ad_1]
.
उर्दू भाषेबाबत न्यायालयीन लढा देणाऱ्यांचा के. एम. टी. हॉलमध्ये कच्छी मेमन जमातर्फे सत्कार करण्यात आला. “उर्दू ही परकी नाही, तर भारताची स्वतःची भाषा आहे, असा निकाल न्यायलयाने दिला होता.
कार्यक्रमाची सुरुवात हाजी असलम गाजी यांच्या कुरआन पठणाने झाली. सोहळ्यात पातूरचे माजी नगराध्यक्ष हाजी सय्यद बुरहान ठेकेदार, माजी उपनगराध्यक्ष सय्यद मुजाहिद ठेकेदार आणि माजी नगरसेवक सय्यद मुज़म्मिल यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी उर्दूच्या समर्थनार्थ सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. कार्यक्रमाला आमदार साजिद खान पठाण, माजी राज्य मंत्री खान मोहम्मद अजहर हुसेन, माजी विरोधी पक्षनेते लतीफ खत्री, माजी नगरसेवक नकीर खान आणि कच्छी मेमन जमातचे अध्यक्ष जावेद ज़कारिया उपस्थित होते. वक्त्यांनी या निकालाला भारतीय संविधान, भाषिक अधिकाराचा विजय म्हटले. हाजी सय्यद बुरहान ठेकेदार यांनी हे प्रकरण पातूर नगर परिषदेतून सुरू होऊन सर्वोच्च न्यायालयापर्यंत कसे गेले, याचा सविस्तर आढावा घेतला.
कार्यक्रमाला माजी नगरसेवक फैयाज खान, रहीम पेंटर, एनुअलहक कुरेशी, सिराज कुरेशी, हाजी अनिक मियाँ, हारून मनिहार, हाशम सेठ ट्रस्टचे अध्यक्ष यासीन कपाडिया, हाजी रफीक मलक, हनीफ मलक, हाजी यासीन बच्चव, सलीम गाजी, हाजी रफीक गाजी, हाजी इकबाल विंधानी, यासीन देदा, वाहिद मुसानी, मोहम्मद अकरम शेख आदी होते. सूत्रसंचालन आंतरराष्ट्रीय शायर नईम फराज यांनी केले आणि आभार जावेद जकारीया यांनी मानले.
[ad_2]