[ad_1]
IPL 2025 PBKS vs DC Cheerleader’s Moments of Panic: गुरुवारी (८ मे) धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) यांच्यात आयपीएल 2025 (IPL 2025) चा 58 वा सामना खेळला जात होता. टाच दरम्यान 10.1 षटकात अचानक वीज गेल्याने सामना थांबवावा लागला. सुरुवातीला हे फ्लड लाईट्सच्या बिघाडामुळे झाल्याचे मानले जात होते. पण हा सामना 10.1 षटकांनंतर पूर्णपणे रद्द करण्यात आला. याच कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढलेला तणाव होतं. धर्मशाळेच्या शेजारील जम्मू-काश्मीर आणि पंजाबमधील शहरांमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. धर्मशाळेतील 23,000 क्षमतेच्या स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या संघाला, कर्मचाऱ्यांना आणि चाहत्यांना अगदी कडक सुरक्षेत बाहेर काढण्यात आले. सामन्यादरम्यान व्हायरल झालेल्या एका चीअरलीडरच्या व्हिडीओमध्ये तिथलं त्यावेळेचं भयानक वातावरण दिसून येत आहे.
काय म्हणाली चीअरलीडर?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये, चीअरलीडर दिसत आहे. ती घाबरलेली आहे. व्हिडीओमध्ये ती बोलताना दिसते की, म्हणाला, “खेळ सुरू असताना संपूर्ण स्टेडियम रिकामी करण्यात आले आहे. हे खूप भयानक आहे . सगळेजण फक्त ओरडत होते की बॉम्ब येत आहेत. अजूनही खूप भीती वाटतेय. आम्हाला खरोखरच धर्मशाळेतून बाहेर पडायचे आहे. मला आशा आहे की आयपीएलचे लोक आमची काळजी घेतील. हे खूप भयानक आहे. मला माहित नाही की मी का रडत नाहीये. कदाचित मी धक्क्यात आहे.”
हे ही वाचा: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान अंबाती रायुडू झाला ट्रोल, ‘या’ ट्विटमुळे आला अडचणीत; नेटिझन्सने शिकवला धडा
हा व्हिडीओ मनबोला विजयबलन यांनी शेअर केला आहे. त्यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “खूपच भयानक, धर्मशाळेत पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळल्या जाणाऱ्या आयपीएल सामन्यातील चीअरलीडरचा एक धक्कादायक व्हिडीओ.”
हे ही वाचा: LSG vs RCB: आज IPL चा सामना होणार की नाही? अरुण धुमाळ यांनी चाहत्यांना दिली माहिती
“Very very scary” – Cheer leader’s SHOCKING video from Punjab Kings Vs Delhi Capitals IPL match in Dharamshala. pic.twitter.com/S830aDKer3
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) May 8, 2025
पंजाब किंग्सच्या 122 धावा
पंजाब किंग्स विरुद्व दिल्ली कॅपिटल्स सामना हा सुरुवातीला पावसाच्या अडथळ्यामुळे उशिरा सुरु झाला होता. पंजाब किंग्सकडून फलंदाजी करत असताना प्रियांश आर्याने 70 धावा केल्या. प्रभसिमरन सिंहने नाबाद 50 धावा केल्या. पंजाब किंग्सने 122 धावा केल्या होत्या.
हे ही वाचा: रोहितची ‘ती’ घोषणा अन् हिटमॅनच्या चाहतीला अश्रू अनावर, ढसाढसा रडतानाचा Video Viral
IPL Chairman requesting fans to leave the Dharamshala Stadium. pic.twitter.com/NhX03h0Ys3
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 8, 2025
खेळाडूंसाठी विशेष ट्रेनची करणार सुविधा
पाकिस्तान हल्ल्याच्या पाश्वभूमीवर धर्मशाला स्टेडियमवरचा पंजाब विरुद्ध दिल्ली सामना रद्द करण्यात आला असताना आता खेळाडूंना सुरक्षित घरी पोहोचवण्यासाठी विशेष ट्रेनची सुविधा करण्यात आलेली आहे. पठणकोट ते दिल्ली अशी विशेष ट्रेन नेण्यात येणार असून यामधून खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि आयपीएल ब्रॉडकास्टिंग स्टाफ इत्यादींना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले जाणार आहे.
[ad_2]