[ad_1]
वाघिणीच्या सहवासासाठी भिषण झुंजीत छोटा मटकाने मारले तीन वाघप्रतिनिधी|नागपूरअधिवास आणि वाघिणीवरील हक्काच्या लढाईतून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रामदेगी वनक्षेत्रात दोन दिवसांपूर्वी छोटा मटका (गेल्या चार वर्षांपासून या वाघाचे राज्य आहे.) आणि ब्रम
.
छोटा मटकासुरने झुंजीत मारलेला हा तीसरा वाघ आहे. यापूर्वी बजरंग आणि मोगली या दोन वाघांनाही छोटा मटका याने मारले आहे. त्याच्या क्षेत्रात इतर कोणीही आलेले त्याला अजिबात खपत नाही.नयनतारा वाघिणीसाठी वीरभद्र आणि ब्रम्हा हे दोन वाघ येत होते. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान छोटा मटका आणि ब्रम्हा वाघात प्राणांतिक झुंज झाली. यात ब्रम्हा ठार झाला. तर छोटा मटकाही जखमी झाला. त्याच्या पायाला चिर मारली आहे. राज्यात 2025 ची सुरुवात वाघांच्या मृत्यूने झाली आणि पहिल्यांदाच जानेवारी संपायचा असताना एक-दोन नाही तर अवघ्या 22 दिवसांत 11 वाघ मृत्युमुखी पडले. त्यामुळे पुन्हा एकदा वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनाचे गांभीर्य प्रश्नांमध्ये अडकले आहे.
राज्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या 11 वाघांच्या मृत्युंपैकी दोन मृत्यूंमागे शिकारीचे कारण असल्याचे स्पष्ट झाले. यात यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यातील वाघांच्या मृत्यूचा समावेश आहे. एका प्रकरणात वाघाचे तीन तुकडे करण्यात आले. तर दुसऱ्या प्रकरणात वाघाची नखे आणि दात गायब होते. वाघिणीच्या पाच ते सहा महिन्यांच्या दोन बछड्यांचे मृतदेह आढळले. दोन मृत्यू हे झुंजीत जखमी झालेल्या वाघांचे होते. तर इतर मृत्यू देखील संशयास्पद आहेत. यातील वाघांच्या शिकारीचा मुद्दा गंभीर मानला जात आहे. एका वाघाच्या शिकारीत बहेलिया शिकाऱ्यांचा ‘पॅटर्न’ नाही, पण दुसऱ्या शिकारीत वाघ आणि नखे गायब असल्याने बहेलिया शिकाऱ्यांचा धोकाही व्यक्त केला जात आहे.
[ad_2]