[ad_1]
निफाड तालुक्यातील लासलगाव, विंचूर, नैताळे, उगाव व परिसराला मंगळवारी दुपारी पुन्हा एकदा मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. त्यामुळे कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
.
निफाड तालुक्याचे तापमान मंगळवारी दुपारी ३५ अंशावर असतांना चार वाजता अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. लासलगाव, उगाव, नैताळे गावासह परिसरात जवळपास १ तास पाऊस सुरू होता. रस्त्यासह शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र पहायला मिळावे. कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आलेल्या शेतकऱ्यांची काही प्रमाणात तारांबळ उडाली होती. नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून जोरदार सुरू असलेल्या या पावसामुळे कामाला देखील अनेक ठिकाणी अडथळा निर्माण होत आहे. खोदकाम केलेला रस्त्यामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने काम करण्यास विलंब होत आहे.
पावसाळा सुरू होण्यास अजून दहा दिवसांचा कालावधी असून अशा परिस्थितीत आत्तापर्यंत निफाड तालुक्यात १८२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. दररोज पावसाळी वातावरण असल्याने उन्हाळा कधी संपला हेच नागरिकांना कळणे अवघड झाले आहे. शेतीची मशागत करावी की थांबावे अशा अडचणीत बळीराजा सापडल्याचे काही चित्र आहे.
[ad_2]