[ad_1]
IPL 2025 Final Update: आयपीएल 2025 आता अखेरच्या टप्प्यात पोहोचलं आहे. एक आठवड्यासाठी स्थगित झालेल्या आयपीएल सीजनची पुन्हा एका दमदार सुरुवात झाली आहे. आता प्लेऑफच्या लढतींसाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 17 मे रोजी IPL पुन्हा सुरू झाल्यानंतर सर्वांनाच प्रश्न पडला होता की, फाइनल कुठे होणार? यावर अखेर यावर मोठं अपडेट समोर आलं आहे. नवीन वेळापत्रकानुसार, आयपीएलचा अंतिम सामना 3 जून रोजी खेळवला जाईल तर प्लेऑफ सामने २९ मे पासून सुरू होतील. आयपीएल 2025 चा अंतिम सामना ईडन गार्डन्सवर होणार नाही.
फायनल कुठे होणार?
IPL 2025 चा अंतिम सामना यंदा कोलकात्याच्या ईडन गार्डन्सऐवजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. Cricbuzz च्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयने (BCCI) आपल्या एका महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेतला. 3 जून रोजी अहमदाबादमध्ये अंतिम सामना पार पडेल. याच मैदानावर 1 जूनला क्वालिफायर-2 चा सामना देखील खेळवली जाईल.
प्लेऑफच्या सामने कुठे होणार?
प्लेऑफची सुरुवात 29 मे रोजी होणाऱ्या क्वालिफायर-1 पासून होईल, तर 30 मे रोजी एलिमिनेटर सामना रंगणार आहे. हे दोन्ही सामने मुलनपूर, न्यू चंदीगडमध्ये होणार असल्याची माहिती मिळाली आहे. यंदा अनेक सामने पावसामुळे प्रभावित झाले आहेत, त्यामुळे हवामानाचा विचार करूनच हे ठिकाण फायनय करण्यात आले आहे.
‘या’ 3 संघांनी केली प्लेऑफमध्ये एंट्री
आयपीएल 2025 मध्ये आरसीबी पंजाब आणि गुजरात या तीन संघांनी प्लेऑफसाठी आपलं स्थान फायनल केलं आहे. मात्र चौथ्या स्थानासाठी दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. उर्वरित काही सामन्यांनंतर या स्पर्धेला कोणता संघ गवसणी घालतो, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
[ad_2]