Sangli Murder Case Update Mother Suicide Over Money Dispute Case | सांगली हादरलं: पैशाच्या वादातून तरुणाचा खून, मुलाच्या गुन्ह्याने व्यथित होऊन आईची आत्महत्या, कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळीतील घटना – Solapur News

0

[ad_1]

कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी येथील अजित उर्फ संजय कृष्णा क्षीरसागर यांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. आरोपींनी दिलेल्या पैशाची मागणी करत असलेल्या रागामुळे ही हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी 8 तासात खून करणाऱ्या सुशांत शेजुळ आणि स्वप्न

.

दरम्यान, आरोपी मुलगा सुशांत शेजुळ याने केलेल्या खूनाचा धक्का सहन न झाल्याने आरोपीची आई विमल शंकर शेजुळ यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना घडली आहे.

साहित्य आणतो म्हणत पडले होते बाहेर

18 मे 2025 रोजी अजित क्षीरसागर हे घरातून दुकान साहित्य आणण्यासाठी बाहेर गेले होते, परंतु ते रात्री उशीरापर्यंत परतले नाहीत. त्यानंतर त्यांचे घरातील सदस्यांनी शोध घेतला, परंतु ते सापडले नाहीत. 20 मे रोजी दुपारी गावात अजित क्षीरसागर जखमी अवस्थेत पडले असल्याची माहिती मिळाली. ते मारुती कारंडे हायस्कूलच्या मागे पडले होते.

नेमके काय घडले?

कुकटोळी गावामध्ये रविवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास आरोपी व क्षीरसागर बसले होते. सुशांत शेजुळ यास उसनवार दिलेले 2 हजार रुपये परत मागितले. पैसे मागितल्याचा राग मनात धरून सुशांत शेजुळ व स्वप्निल क्षीरसागर अजित क्षीरसागर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडले. सुशांत शेजुळ या तरुणाने डोक्यात दगड घालून हत्या केली. सदर हत्येची बातमी गावात पसरली. संशयित तरुण सुशांत शेजुळ याची आई विमल शेजुळ यांना आपल्या मुलाने हत्या केल्याची बातमी समजली. गावातील नागरिकांनी घटनास्थळावर मोठी गर्दी. या हत्येची गावभर जोरदार चर्चा झाली. जखमी अवस्थेत अजित क्षीरसागर यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here