[ad_1]
भारतीय रेल्वेच्या वतीने मेरा अमृत स्टेशन आणि ऑपरेशन सिंदूर – वीरतेचे प्रतिक या विषयांवर देशभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत लासलगाव परिसरातील विविध शाळांमध्य
.
जिजामाता कन्या विद्यालय, श्री महावीर विद्यालय कला, वाणिज्य आणि सायन्स कॉलेज लासलगाव येथील एकूण १९० विद्यार्थी यांनी निबंध लेखन व चित्रकला अशा दोन प्रकारांमध्ये सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना देणे, देशभक्तीची भावना वाढवणे, तसेच रेल्वेच्या पायाभूत सुविधा विकास व सशस्त्र दलांच्या शौर्याचे महत्व अधोरेखित करणे यासाठी रेल्वेतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिजामाता कन्या विद्यालय, श्री महावीर विद्यालय, कला, वाणिज्य आणि सायन्स कॉलेज लासलगाव येथील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला. त्यांनी आपल्या निबंध व चित्रांद्वारे विषयांची समाज आणि देशभक्तीची भावना प्रभावीपणे मांडली. दरम्यान, रेल्वे विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत निबंध लेखन आणि चित्ररेखाटन केले.
[ad_2]