[ad_1]
सोलापूरमधील काँग्रेसचे नेते सिद्धाराम म्हेत्रे हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. 31 मे रोजी आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सिद्धाराम म्हेत्रे यांनी माध्यम
.
सिद्धाराम म्हेत्रे हे काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्यातील प्रभावशाली आणि अनुभवी नेते मानले जातात. त्यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे, तसेच गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारीही यशस्वीरित्या सांभाळली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे काँग्रेसने सोलापूर जिल्ह्यात आपली पकड मजबूत ठेवली होती. मात्र आता त्यांनी थेट एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यामुळे जिल्ह्यातील राजकारणात एक नवे वळण येण्याची शक्यता आहे.
कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर घेतला निर्णय
काँग्रेसने मला भरपूर काही दिले, पण मागच्या काही वर्षात ज्या पद्धतीने ताकद द्यायला पाहिजे होती ती दिली नाही. कार्यकर्त्यांना अनेक प्रकारे त्रास होत होता, त्यामुळे काहीतरी निर्णय घ्या, असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत गेले पाहिजे असे कार्यकर्त्यांनी सांगितले त्यामुळेच हा निर्णय घेतला, असे सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले. 31 मे रोजी एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये अक्कलकोटमध्ये प्रवेश होईल असेही त्यांनी सांगितले.
दुश्मन से दोस्ती हर हाल में अच्छी
सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे यांच्याबद्दल मला काहीही बोलायचे नाही. ज्या पद्धतीने सचिन कल्याण शेट्टी यांना त्यांच्या पक्षाने ताकद दिली, तशी ताकद काँग्रेसकडून मिळाली नाही. आमच्या कार्यकर्त्यांना अनेक प्रकारे त्रास तालुक्यात दिला जात होता. तो थांबला पाहिजे म्हणून हा प्रवेश आहे. जर दिला जाणारा त्रास थांबला नाही, तर मित्रपक्षांत देखील संघर्ष मला करावा लागणार आहे. दुश्मन से दोस्ती हर हाल में अच्छी असे म्हटले जाते. त्यामुळे ही दोस्ती देखील आम्ही करून बघू. पण जर त्रास थांबला नाही, तर संघर्षही करावा लागेल असे ते म्हणाले. या संदर्भात माझे सुशीलकुमार शिंदे किंवा प्रणिती शिंदे यांच्याशी कोणतेही बोलणे झालेले नाही, असेही सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले.
कोण आहेत सिद्धाराम म्हेत्रे?
सिद्धाराम म्हेत्रे हे राज्याचे माजी गृहराज्यमंत्री होते. अक्कलकोट येथे म्हेत्रे घराण्याची मोठी ताकद आहे. ते काँग्रेसच्या तिकिटावर 4 वेळा अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवून गेले आहेत. सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. वडिलांपासून ते काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत.
मात्र, 2019 नंतर अक्कलकोटच्या राजकारणात एक मोठा बदल घडला. भाजपचे सचिन कल्याणशेट्टी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सिद्धाराम म्हेत्रे यांची राजकीय ताकद कमी होत गेली. सलग दोन विधानसभा निवडणुकांमध्ये पराभवाच्या धक्क्यांनी त्यांच्या गोटात निराशा पसरली. त्यातच त्यांच्या नेतृत्वाखालील साखर कारखाना आणि इतर सहकारी संस्था अडचणीत होत्या.
निवडणुकींपूर्वीच काँग्रेसला हादरे
राज्यातील काँग्रेसचे अनेक नेते, पदाधिकारी पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे पाहायला मिळत आहे. रवींद्र धंगेकर यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसला राम राम ठोकत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आता सिद्धराम म्हेत्रे यांच्यासारख्या बड्या नेत्यानेही काँग्रेसचा हात सोडला आहे. यामुळे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होण्यापूर्वी काँग्रेसची ताकद कमीकमी होत असल्याचे म्हटले जात आहे.
[ad_2]