Fans heartfelt tribute virat kohli retirement White Pigeons Group Spotted Over M Chinnaswamy Stadium During Rcb Vs Kkr Ipl 2025 Match | निसर्गानेही विराटला ठोकला सलाम! पक्ष्यांनी किंग कोहलीला दिला ट्रिब्यूट, बेंगळुरू स्टेडियमवरती दिसले अद्भुत दृश्य

0

[ad_1]

RCB vs KKR: 17 मेपासून पुन्हा सुरू झालेल्या आयपीएलचा उत्साह द्विगुणीत झालेला दिसला. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधील निरोपाची तयारी जोरात सुरू होती. विराटच्या चाहत्यांना 18 क्रमांकाची जर्सी घालून त्याला एक आठवणीत राहील असा कसोटी निरोप द्यायचा होता. विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतली आणि चिन्नास्वामी स्टेडियमवर त्यांच्या निरोपासाठी चाहत्यांची गर्दी उसळली.  पण कोहलीला मैदानावर पाहण्याची संधी मिळाली नाही. मात्र, पावसामुळे सामना रद्द झाला. चिन्नास्वामीमध्ये पाऊस थांबला नाही, त्यामुळे नाणेफेक न करता सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, पावसामुळे सामना रद्द झाला. याच वेळी निसर्गाने एक अद्भुत करिश्मा दाखवत विराटला ‘सलाम’ ठोकला. 

विराटला निसर्गानेही केला सलाम

विराट कोहली हे जगातील महान फलंदाजांपैकी एक आहेत. त्याने भारतीय टेस्ट क्रिकेटचं चेहरा पूर्णपणे बदलून टाकला. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने असे अनेक रेकॉर्ड्स केले, जे अगदी कुठल्याही कर्णधाराला शक्य झाले नाहीत. फक्त एवढंच नाही, तर विराट कोहलीने काही अनोखे आकडेही आपल्या नावावर केले आहेत. अशा महान ‘किंग’ कोहलीच्या टेस्ट क्रिकेटमधून अचानक निरोपाची कुणालाही अपेक्षा नव्हती. विराटने फक्त एका इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून टेस्ट क्रिकेटला अलविदा म्हटलं. त्यांच्यासाठी ना कोणता गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला, ना कोणता फेअरवेल सामना, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.

चाहत्यांनी निरोपासाठी केला होता प्लॅन 

चिन्नास्वामी येथील सामन्यापूर्वीच सोशल मीडियावर पांढऱ्या रंगाची जर्सी घालण्याची तयारी करण्यात आली होती. टी-20 सामन्यात पहिल्यांदाच असे दृश्य दिसले. 18 क्रमांकाच्या जर्सीसाठी गर्दी जमली होती. स्टेडियममध्ये हजारो चाहत्यांनी 18 नंबरची जर्सी घालून विराटला आदरांजली वाहिली होती. संपूर्ण स्टेडियम पांढऱ्या रंगात झळकत होतं. मात्र, पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. त्याच वेळी एक अद्भुत दृश्य घडलं. स्टेडियमच्या आकाशात परिंद्यांचा थवा गोलाकार फिरत होता, जणू निसर्ग विराटला निरोप देत होता. हे दृश्य पाहून उपस्थित प्रेक्षक भावूक झाले.

सोशल मीडियावर हे दृश्य व्हायरल झालं असून लोक म्हणाले, “किंग कोहलीला निसर्गाचा सलाम मिळाला.”

 

विराटची कामगिरी 

विराटने आपल्या टेस्ट कारकीर्दीत 111 सामने खेळून 8,848 धावा केल्या. 10,000 धावांचं स्वप्न त्याने बाजूला ठेवलं. आता त्याचा पूर्ण लक्ष RCB ला पहिली IPL ट्रॉफी मिळवून देण्यावर आहे. RCB यंदा शानदार फॉर्ममध्ये आहे. कोहलीही दमदार खेळ करत आहे. संपूर्ण देश विराटच्या ऐतिहासिक निरोपासाठी आणि RCB च्या पहिल्या विजयानिमित्त प्रार्थना करत आहे.



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here