Rare solar halo seen in Nagpur, ice crystals in cirrus clouds formed craters at 20,000 feet | नागपुरात दिसलं दुर्मिळ सूर्य प्रभामंडळ: सिरस ढगांमधील बर्फाच्या स्फटिकांमुळे 20 हजार फुटांवर तयार झाले खळे – Nagpur News

0

[ad_1]

नागपुरात लोकांनी अनुभवले सूर्य प्रभामंडळ, 20 हजार फूट उंचीवर सिरस नावाचे ढगांमुळे तयार होते खळेप्रतिनिधी|नागपूरएरवी अनेकदा चंद्राभोवती खळे पाहायला मिळते, पण सूर्याचं खळे तसं दुर्मिळ. अशा खळ्याला प्रभामंडळ किंवा इंग्रजीत हालो असेही म्हणतात. सूर्य प्रभ

.

हे स्फटिक सूर्याच्या किरणांना विशिष्ट कोनातून अपवर्तित करतात, त्यामुळे प्रकाशाचे अपवर्तन होते आणि प्रभामंडळ तयार होते. सूर्य प्रभामंडळ ही एक दुर्मिळ आणि सुंदर खगोलीय घटना आहे. हे दृश्य लोकांना सूर्याच्या प्रकाशाचे आणि आकाशातील बर्फाच्या स्फटिकांचे सौंदर्य अनुभवण्याची संधी देते. ढग हिमकणांनी भरलेले असतात, तेव्हाच खळे दिसते.जेव्हा प्रकाशकिरण 60° शिरोकोन असणाऱ्या षटकोनी हिमकणातून आरपार जातात तेव्हा त्यांचे दोनदा वक्रीभवन होऊन ते 22° ते 50° कोनातून वळतात. त्यांचा वळण्याचा कमीत कमी कोन हा अंदाजे 22° (लाल तरंग लहरींसाठी अचूक 21.84° तर नील तरंगांसाठी 22.37°) असतो.

प्रत्येक तरंगांसाठी हा कोन वेगळा असल्याने अशा खळ्यातील आतील कड लालसर तर बाहेरील कडा निळसर दिसते. अशा हिमकणांमुळे सर्वच प्रकाशाचे वक्रीभवन होते. पण ठराविक ठिकाणाहून बघणाऱ्याला त्यापैकी फक्त 22° तून वळलेल्या प्रकाशाचेच कडे दिसते. 22°’पेक्षा कमी कोनातून प्रकाशाचे वक्रीभवन होत नसल्यामुळे अशा कड्याच्या आत प्रकाश नसतो व त्यामुळे आतील आकाश मात्र काळे दिसते.हिमकणांमुळे खळ्याची निर्मिती होते ते कण व्यक्तिसापेक्ष असतात. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीसाठी ते वेगवेगळे असतात.

त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला दिसणारे खळे हे वेगळे व एकमेकाद्वितीय असते. अगदी शेजारी शेजारी उभे राहून खळे पाहणाऱ्या व्यक्तीही प्रत्यक्षात वेगवेगळी खळी पहात असतात. सूर्याभोवती किंवा चंद्राभोवती ज्यात कडे दिसते असा आणखी एक देखावा म्हणजे त्यांच्या भोवती दिसणारे तेजोवलय . अशा वलयांची आणि 22 अंशा°च्या खळ्याची बऱ्याचदा गल्लत केली जाते. पण अशी वलये ही 22 अंशा°च्या खळ्यापेक्षा बरीच छोटी पण काहीशी रंगीत आणि सूर्यालगत किंवा चंद्रालगत असतात.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here