कणकवलीत बांधकाम कामगार महासंघाचे वार्षिक अधिवेशन
गोंदवले प्रतिनिधी :- सरकारच्या माध्यमातून आपण एकत्र आलो आहोत भारतीय कामगार संघटना आणि प्रत्येक कामगाराला मजबूत करण्यासाठी मी बांधकाम कामगार महासंघाच्या पाठीशी आहे तुमच्या मुळेच आम्ही सत्तेत आलो आहोत सरकार पातळीवरील सर्व योजना तुमच्या पर्यंत पोहोचविणार.मी तुमचाच माणूस आहे जिथे अडचण असेल तेथे मला हाक द्या.फोन करा,असा विश्वास मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री निलेश राणे यांनी दिला.
भारतीय मजदूर संघाच्या, बांधकाम कामगार महासंघ महाराष्ट्र प्रदेशचे ४ थे वार्षिक प्रदेश अधिवेशन कणकवली येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी मंत्री नितेश राणे बोलत होते.भाजपा कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कणकवली माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहा.कामगार आयुक्त संदेश आयरे, भारतीय मजदूर संघ प्रदेश अनिल ढुमणे, भारतीय मजदूर संघांचे प्रदेश महामंत्री किरण मिलिगरी, प्रदेशाध्यक्ष हरि चव्हाण, प्रदेश संघटण मंत्री उमेश महाडिक, प्रदेश कोषाध्यक्ष बाळकृष्ण कांबळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ना. राणे म्हणाले एखादा अधिकारी किंवा व्यक्ती कामगारांची फसवणूक करत असेल तर कोणाला सोडणार नाही तुम्ही फक्त माहिती द्या. तुमच्या सारख्या सामान्य कामगारांना फसविताना कोण दिसला तर पुन्हा तो त्या पदावर असणार नाही असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला.
यावेळी बांधकाम कामगार महासंघाचे प्रदेश सरचिटणीस संजय सुरोशे यांनी आपल्या मागील तीन वर्षांच्या कालावधीतील कार्य अहवाल सादर केला. अधिवेशनात नोंदीत कामगारांना ९० दिवस कामगारांना कामांचे प्रमाणात मिळावे, पेन्शन योजनेत कामगारांचा सहभाग वाढवावा , बांधकाम मंडळाचे पुनर्गठन करण्यात यावे, जिल्हास्तरावर तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात यावी आदी ठराव पारित करण्यात आले.
सदर अधिवेशनात आगामी तीन वर्षांच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली यामध्ये बांधकाम कामगार महासंघाच्या प्रदेश अध्यक्षपदी हरी चव्हाण यांची निवड करण्यात आली तर प्रदेश सरचिटणीस म्हणून भामसंघ सातारा जिल्हा सचिव रविद्र माने यांची निवड करण्यात आली.सौ.रेश्मा सत्यवान शिलवंत यांची सातारा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.लहूराज शिंगाडे चिटणीस सातारा , कोषाध्यक्ष बाळकृष्ण कांबळे ठाणे, संघटनमंत्री म्हणून संजय सुरोशे नांदेड, कार्यकारणी सदस्य म्हणून जयवंत शेटे सातारा यांची निवड एक मताने करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असंघटित क्षेत्र सहप्रभारी श्रीपाद कुटासकर यांनी केले सदर अधिवेशनास महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यामधून बहुसंख्येने बांधकाम कामगार उपस्थित होते.