Water level of Krishna-Venna River Increases at Sangam Mahuli Satara | संगम माहुली येथे कृष्णा-वेण्णाच्या पाणी पातळीत वाढ: छत्रपती शाहू महाराज यांची समाधी पाण्याखाली, घाटाच्या पायऱ्यांना टेकले पाणी – Kolhapur News

0

[ad_1]

सातारा जिल्ह्याला अवकाळी पावसाने मोठा फटका दिला आहे. सातारा शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून संगम माहुली येथील कृष्णा-वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. या पाण्यामुळे नदी पात्रात असलेली छत्रपती थोरले शाहू महाराज यांची समाधी निम्मी पाण्याखा

.

सातारा जिल्ह्यात दरवर्षी 15 जून नंतर मान्सून सक्रिय होतो. मात्र अवकाळी पावसाने मे महिन्यातच जोर पकडावा आणि जिल्ह्याच्या 24 मंडलांमध्ये मुसळधार पाऊस व्हावा असा प्रकार गेल्या पंचवीस वर्षात प्रथमच घडला आहे. त्यामुळे नेहमी चर्चेत असलेल्या संगम माहुली येथे असलेल्या कृष्णा व वेण्णा या नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे.

माहुलीचा काशीविश्वेश्वर घाट पाण्याखाली जाण्याची चिन्हे आहेत. साधारण जुलै, ऑगस्टमध्ये अशी परिस्थिती निर्माण होते. मात्र यंदा मे महिन्यातच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सातारा शहराचे संस्थापक छत्रपती थोरले शाहू महाराज यांची समाधी देखील निम्मी पाण्याखाली गेली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कैलास स्मशानभूमीच्या पायऱ्यांना पाणी लागले आहे. दरम्यान मे महिन्यातच प्रथमच संगम माहुली घाट जलमय झाल्याने पाणी पाहण्यासाठी घाटावर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.

हे ही वाचा…

साताऱ्यात ड्रग्स निर्मितीच्या रॅकेटचा पर्दाफाश:तासवडे एमआयडीसीतून 6.35 कोटींचे 1270 ग्रॅम कोकेन जप्त; 5 जणांवर गुन्हा दाखल, 3 अटकेत

कराडनजीकच्या तासवडे एमआयडीसीतील शेतीची औषधे तयार करणाऱ्या सुर्यप्रभा फार्मकेन कंपनीवर छापा टाकून ६.३५ कोटींचं १२७० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलं आहे. कराडच्या डीवायएसपी यांच्या पथकासह तळबीड पोलिसांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन जणांना अटक केली असुन एक जण तेलंगणा त पोलिस कोठडी मध्ये आहे. पोलिस कोठडी संपल्यावर त्याचा आम्हाला ताबा मिळेल. एक आरोपी फरार आहे. अशी माहिती सातारचे नूतन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. साताऱ्यासारख्या सर्वार्थाने पुढारलेल्या जिल्ह्यात देखील ड्रग्ज कारखाना सुरू असल्याचं यानिमित्तानं समोर आलं. पूर्ण बातमी वाचा…

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here