[ad_1]
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची धग अजून निवळलेली नसतानाच, पिंपरी चिंचवडमध्ये हुंडाबळीची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 22 वर्षांच्या विवाहितेने लग्नाच्या अवघ्या पाचव्या महिन्यात सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली
.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी खरेदीसाठी माहेरहून 50 हजार रुपये न आणल्याने सासरच्या मंडळींनी मानसिक दबाव टाकल्याचा आरोप पूजाच्या कुटुंबीयांनी केला आहे. पूजाचा विवाह गजानन निर्वळ याच्याशी काही महिन्यांपूर्वी झाला होता. मात्र, लग्नानंतर थोड्याच दिवसांत तिला सासरी त्रास दिला जाऊ लागला. माहेरच्यांनी दुचाकीसाठी पैसे न दिल्यामुळे तिचा मानसिक छळ सुरू केला. अखेर या जाचाला कंटाळून पूजाने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. तिच्या मृत्यूनंतर पोलिसांनी पती गजानन निर्वळ आणि नणंद राधा यांच्याविरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेला आता एक महिना उलटून गेला असतानाही संबंधित आरोपी अजूनही मोकाटच आहेत. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असला, तरी कारवाईकडे लक्ष देत नसल्याचा आरोप पूजाच्या कुटुंबीयांनी केला आहे. “ही आत्महत्या नव्हे, तर खून आहे,” असा दावा करत पूजाच्या कुटुंबियांनी पोलिसांवर सहकार्य न करण्याचा आरोप केला आहे. तर पोलिसांना याबाबत विचारले असता या प्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला असून तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हे ही वाचा…
रूपाली चाकणकरांबद्दलच्या पोस्टवरून महिलेला धमकावले?:महिलांना विरोध करण्याचीही मुभा राहिली नाही का? रोहिणी खडसेंचा सरकारला सवाल
पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे. काहींनी तर रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली. त्यातच आता सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये चाकणकर यांच्या एका समर्थक महिलेने एका सामान्य महिलेला फोन करून धमकावल्याचा आरोप होत आहे. ही क्लिप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी स्वतः त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर करत संताप व्यक्त केला आहे. पूर्ण बातमी वाचा…
[ad_2]