ipl 2025 gt vs csk may be the last match of ms dhoni in ipl

0

[ad_1]

IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये रविवारी 67 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स (GT VS CSK) यांच्यात पार पडला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या चेन्नई सुपरकिंग्सचा आयपीएल 2025 मधील हा शेवटचा सामना आहे. यंदाचा सीजन सीएसकेसाठी अजिबात चांगला राहिला नाही, तसेच त्यांचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याला दुखापतीच्या कारणामुळे सीजनमधून अर्ध्यातच बाहेर पडावे  लागले. त्यामुळे एम एस धोनीकडे पुन्हा एकदा सिएसकेचे कर्णधारपद सोपवण्यात आले. धोनी सध्या 43 वर्षांचा असून जुलै महिन्यात त्याचा 44 वा वाढदिवस असेल. आयपीएल 2026 मध्ये धोनी खेळेल की नाही याबाबत शंका आहे, त्यामुळे रविवारी गुजरात विरुद्धचा सामना शेवटचा ठरू शकतो. 

IPL मध्ये शेवटचा सामना खेळणार धोनी?

आयपीएल 2025 मधील गुजरात विरुद्ध चेन्नई सामना एम एस धोनीसाठी शेवटचा आयपीएल सामना ठरू शकतो. धोनीने ऑगस्ट 2020 मध्ये  आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून आजही खेळतोय. एम एस धोनीने जवळपास 15 वर्ष चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार म्हणून जबाबदारी पेलली आहे. आयपीएल 2024 पूर्वी त्याने ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद सोपवले, तसेच यापूर्वी जडेजाकडे सुद्धा सीएसकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी होती. आयपीएल 2025 मध्ये ऋतुराज गायकवाड हा दुखापतग्रस्त झाल्याने सीजनच्या मध्यातच नेतृत्व पुन्हा धोनीकडे सोपवण्यात आले. यंदा संघाचा परफॉर्मन्स चांगला नव्हता त्यामुळे चेन्नई आयपीएल 2025 च्या प्लेऑफमधून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. 

काय म्हणाला एम एस धोनी : 

गुजरात विरुद्ध टॉस जिंकल्यावर धोनीने चेन्नई संघासाठी प्रथम फलंदाजी निवडली आणि त्यांना गोलंदाजीचं आव्हान दिलं. टॉस झाल्यावर रवी शास्त्रींनशी बोलताना धोनी म्हणाला की, ‘माझं शरीर अजूनही मला साथ देतंय, पण त्याला बरीच देखभालही आवश्यकता असते. माझ्या कारकीर्दीचा हा शेवटचा टप्पा आहे. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना मला पुरेसा त्रास झाला नाही’. यापूर्वी अनेकदा धोनीला त्याच्या आयपीएल निवृत्तीबाबत विचारण्यात आलं होतं. तेव्हा धोनी म्हणाला होता की, मी हा सीजन संपल्यावर माझ्या शरीरावर, फिटनेसवर मेहनत घेईन, आयपीएलच्या पुढील सीजनपूर्वी मला वाटलं की मी फिट आहे तर मी आयपीएलमध्ये अजून खेळेल.  हे सर्व माझ्या शारीरिक क्षमतेवर अवलंबून आहे. 



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here