उरण तालुक्यातील नुकसानग्रस्त घरांची महेंद्र घरत यांनी केली पाहणी

0

उरण दि २७(विठ्ठल ममताबादे )

दिनांक २६ मे २०२५ रोजी सकाळी अचानक झालेल्या जोरदार पावसाने आणि चक्रीवादळाने संपूर्ण उरण तालुक्यामध्ये हाहाकार माजवला उरण तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरावरील पत्रे ,  उडाली, पत्रे उडून घरामधील अनेक साहित्याची  तोडफोड झाली आहे, अनेक विद्युत उपकरनांची नासधुस झाली आहे.अनेक कडधान्य  वाया गेले आहेत तसेच काही नागरिक सुद्धा यामध्ये दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामध्ये कळंबूसरे  आणि सारडे या गावांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे म्हणूनच जिथे विषय गंभीर तिथे महेंद्रशेठ खंबीर या उक्तीप्रमाणे सतत गोरगरिबांना, संकटामध्ये असणाऱ्या नागरिकांना मदत करणारे नेते जे नाही आमदार नाही खासदार पण समाजाची असणारी बांधिलकी जोपासून प्रत्येक संकटाच्या वेळी धावून जाणारे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी कळंबुसरे आणि सारडे या दोन्ही गावांमध्ये जाऊन ज्या ज्या घरी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे त्याची पाहणी करून त्वरित त्यांना मदतीचे आश्वासन दिले .

प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत जागेवरून चर्चा करून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मदत देऊन आणि ती मदत लवकर लवकर द्यावी यासाठी कलेक्टर, प्रांत, उरणचे तहसीलदार यांना फोन करून तसेच जागेवर असणारे शासकीय अधिकारी यांना विनंती केली. यावेळी त्यांच्या समवेत उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद भाई म्हात्रे, महाराष्ट्र प्रदेश युवक इंटक उपाध्यक्ष लंकेश ठाकूर, रायगड जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष उमेश भोईर, कलंबुसरे सरपंच उर्मिला नाईक, उरण तालुका युवक इंटक अध्यक्ष राजेंद्र भगत, माजी उपसरपंच सारिका पाटील, काँग्रेस नेते भालचंद्र पाटील, माजी उपसरपंच रवींद्र पाटील, शिवसेना नेते निनाद नाईक, काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील, ग्रामपंचायतीचे सदस्य,सामाजिक कार्यकर्ते महेश भोईर, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते डी बी भोईर, संकेत पाटील तसेच मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त नागरिक,ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here