[ad_1]
नांदेड परिक्षेत्रातील चार जिल्हयामधून अवैध व्यवसायाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या मोहिमेत एका महिन्यात 1561 ठिकाणी छापे टाकून 7.78 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर आता जून महिन्यात अभियान 2 राब
.
नांदेड परिक्षेत्रात नांदेडसह, हिंगोली, परभणी, लातुर जिल्हयात अवैध दारू, मटका, जुगार, ऑनलाइन लॉटरी, क्रिकेट बॅटिंग, गुटखा, अंमली पदार्थ, वाळू उपसा व वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक इत्यादींना आळा घालण्यासाठी ता. 1 मे ते ता. 31 मे या कालावधीत नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध व्यवसाय विरोधी अभियान हाती घेण्यात आले होती. या मोहिमेत पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, अंमलदार यांचेसह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व अपर पोलीस अधीक्षक, या सोबतच स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पोलीस पथके कार्यरत करण्यात आले. या अभिनात संपूर्ण महिनाभर दर आठवाड्याला केलेल्या कारवाईचे मुल्यमापन करण्यात आले.
दरम्यान ता. 1 मे ते ता. 31 मे या कालावधीत 1561 ठिकाणी छापे टाकण्यात आले असून 7.78 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात 371 ठिकाणी छापे टाकून 3.07 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परभणी जिल्हयात 376 ठिकाणी छापे टाकून 2.16 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हिंगोली जिल्हयात 403 ठिकाणी छापे टाकून 73.33 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे तर लातुर जिल्हयात 400 ठिकाणी छापे टाकून 1.81 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये सर्वात जास्त दारुबंदीच्या केसेस करण्यात आल्या असून 1031 ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 59.66 लाख रुपयांची दारु व दारु गाळपासाठी लागणारे रसायन जप्त केले आहे.
या शिवाय 344 ठिकाणी मटका व जुगार अड्डयावर छापे टाकले असून 22.53 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच इतर 175 केसेस करून 6.96 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, आता नांदेड परिक्षेत्रात जून महिन्यात अवैध व्यवसाय विरोधी अभियान 2 राबविले जाणार असून संपूर्ण महिनाभरात अवैध व्यवसायावर कारवाई केली जाणार असल्याचे नांदेड पोलिस उपमहानिरीक्षक कार्यालयाच्या सुत्रांनी सांगितले.
[ad_2]