[ad_1]
Who is Priya Saroj: भारतीय क्रिकेट संघाचा दमदार फलंदाज आणि KKR चा स्टार खेळाडू रिंकू सिंग ( Rinku Singh Wedding) आता आयुष्याच्या नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग लवकरच लग्न करणार आहे. आयपीएल (IPL 2025) संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांत तो साखरपुडा करणार असून, यावर्षाच्या अखेरीस लग्नही पार पडणार आहे. रिंकूची जीवनसाथी होणारी प्रिया सरोज कोण आहे आणि ती काय करते? चला जाणून घेऊयात…
साखरपुडा लखनऊमध्ये तर लग्न वाराणसीत
रिंकू आणि प्रिया सरोज 8 जूनला लखनऊमधील एका फाईव्हस्टार हॉटेलमध्ये साखरपुडा करणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर 18 नोव्हेंबर रोजी वाराणसीच्या ताज हॉटेलमध्ये दोघांचं मोठ्या थाटामाटात लग्न होणार आहे. या नवीन जोडीबद्दल चाहत्यांमध्येही मोठी उत्सुकता आहे. रिंकूच्या लग्नाची सगळेच वाट बघत आहेत.
प्रिया सरोज कोण आहे?
प्रिया सरोज ही राजकारणात सक्रीय असलेल्याली तरुणी आहे. ती सध्या मच्छलीशहर (उत्तर प्रदेश) येथून समाजवादी पक्षाची खासदार आहे. ती देशातील सर्वात तरुण खासदारांपैकी एक आहे. वाराणसीजवळील करखियांव गावात तिचं मूळ असून, तिचे वडील तूफानी सरोज हेही अनेक वर्षांपासून समाजवादी पक्षाशी जोडले गेले आहेत.
शिक्षण किती झालं आहे?
प्रिया सरोजने नवी दिल्लीतील ‘एअर फोर्स गोल्डन जुबली इन्स्टिट्यूट’मधून शालेय शिक्षण घेतलं असून, नंतर नोएडामधील ‘एमिटी युनिव्हर्सिटी’मधून तिने लॉची पदवी (LLB) मिळवली आहे. राजकारणात येण्याचा पूर्वी या क्षेत्रात येण्याचा काहीही मानस नव्हता, असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
प्रिया आणि रिंकूची भेट कशी झाली?
माहितीनुसार, रिंकू सिंग आणि प्रिया सरोजची ओळख त्यांच्या एका मित्रामार्फत झाली होती. एक वर्षांहून अधिक काळ ते एकमेकांच्या संपर्कात होते. दोघांनाही एकमेकांची पसंती होती, पण नातं पुढे नेण्यासाठी दोन्ही कुटुंबांची संमती आवश्यक होती. प्रिया यांचे वडील तूफानी सरोज यांनी स्वतः सांगितलं की, दोन्ही घरांमध्ये या नात्याला संपूर्ण पाठिंबा आहे.
क्रिकेटर आणि खासदार एकत्र येणार!
या दोघांच्या जोडीमध्ये एकीकडे क्रिकेटच्या मैदानावर चौकार-षटकारांच्या दुनियेत असलेला रिंकू आहे , तर दुसरीकडे देशाच्या संसदेत राजकीय घडामोडींना दिशा देणारी तरुण प्रिया आहे.
[ad_2]