[ad_1]
चंद्रपूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. भरधाव हायवाने 10 वाहनांना धडक दिली. तुकूम ते ताडोबा रस्त्यावर सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. हायवा चालवत असलेल्या चालकाला अचानक फिट आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने फुटपाथवरील नागरिकांना धडक दिली. या अनिय
.
हायवा चालकाला धावत्या वाहनात अचानक फिट आल्याने वाहन अनियंत्रित झाले. त्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या दहा वाहनांना जोरदार धडक दिली. या घटनेत वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातानंतर परिसरात प्रचंड गोंधळ निर्माण झाला. स्थानिकांनी तत्काळ मदत करत जखमी तरुणीला रुग्णालयात दाखल केले, तर पोलिसांनी तातडीने कारवाई करत हायवा चालकाला ताब्यात घेतले आहे.
या दुर्घटनेनंतर महाऔष्णिक केंद्र 2, तुकूम, ताडोबा मार्ग परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. या मार्गावरील नियोजनाचा अभाव, मोठ्या वाहनांची बेफिकीर वाहतूक, आणि स्थानिक यंत्रणांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या भागात अपघातांची संख्या वाढत चालली असून नागरिकांनी आता या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
तरुणीचे पोलिस होण्याचे स्वप्न अपूर्ण
या अपघातात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. सानिका कुमरे असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. सानिका ही लक्कडकोट परिसरातील रहिवासी होती. एक दिवस ती पोलिस खात्यात रुजू होईल, असे तिचे स्वप्न होते. यासाठी ती पोलिस भरतीसाठी कठोर मेहनत करत होती. मात्र नियतीच्या क्रूर खेळात तिचे हे स्वप्न अपूर्णच राहिले. सानिकाच्या मृत्युमुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली आहे.
पुण्यात कारने 12 विद्यार्थ्यांना उडवले
दरम्यान, पुण्यातही दोनच दिवसांपूर्वी असाच एक अपघात घडला होता. एका मद्यधुंद कार चालकाने एमपीएससीची तयारी करणाऱ्या 12 विद्यार्थ्यांना उडवले होते. पुण्यातील भावे स्कूल परिसरात ही घटना घडली होती. त्या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली असून, अपघात करणारा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने हा अपघात झाला होता.
[ad_2]