क्वालिफायर 2 मधील पराभवानंतर मुंबई इंडियन्सवर भडकले रोहितचे फॅन्स, ट्रोल होतोय हार्दिक पंड्या

0

[ad_1]

IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये रविवार 1 जून रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स त्यांच्यात क्वालिफायर 2 सामना पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबईचा 5 विकेट आणि 1 ओव्हर राखून पराभव केला आणि यासह ते फायनलमध्ये पोहोचले आहेत. 3 जून रोजी आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात फायनल सामना पार पडेल. क्वालिफायर 2 सामन्यातील पराभवामुळे 2020 च्यानंतर पुन्हा एकदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचं मुंबई इंडियन्सचं स्वप्न धुळीस मिळालं. या पराभवानंतर काही फॅन्स मुंबई इंडियन्स फ्रेंचायझी आणि हार्दिक पंड्याला ट्रोल करत आहेत. 

6 व्यांदा ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं : 

आयपीएलला यंदा तीन वर्षानंतर नवा विजेता मिळणार आहे. 2022 मध्ये गुजरात टायटन्सने ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. तर 2023 मध्ये चेन्नई सुपरकिंग्स आणि 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने ट्रॉफी जिंकली होती. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. यंदा 6 व्यांदा ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न मुंबई इंडियन्सचं होतं मात्र पंजाब किंग्सने मुंबईची वाट अडवली आणि क्वालिफायर 2 मध्ये पराभूत करून मुंबईला थेट स्पर्धेच्या बाहेर पोहोचवलं. मागच्यावर्षी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून बाजूला करून हार्दिक पंड्याकडे संघाचं नेतृत्व सोपवलं होतं. ज्यावरून हार्दिक आणि फ्रेंचायझीला मोठ्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. आता पुन्हा एकदा याची चर्चा होऊ लागली आहे. 

मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्याला केलं ट्रोल : 

क्वालिफायर 2 सामन्यातील अनेक निर्णयांमुळे हार्दिक पंड्यावर रोहित शर्माचे फॅन्स नाराज दिसत आहेत. फॅन्सचं म्हणणं आहे की, रोहित शर्मा हा हार्दिक पेक्षा चांगला कर्णधार आहे. त्याचीही जागा कोणीही घेऊ शकत नाही. फॅन्सचं म्हणणं आहे की जर रोहित शर्मा कर्णधार असता तर मुंबई इंडियन्सवर 200 धावा करूनही पराभूत होण्याची वेळ आली नसती. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई इंडियन्स 200 हुन अधिक धावा करून सुद्धा पराभूत झाली. 

हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह : 

हार्दिक पंड्या हा 2023 पर्यंत गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. 2024 च्या आयपीएलपूर्वी त्याला ट्रेड करून मुंबई इंडियन्समध्ये घेण्यात आले.  आयपीएल 2024 मध्ये त्याच्या नेतृत्वात मुंबईचा परफॉर्मन्स फार वाईट होता आणि त्यांना 14 लीग स्टेज सामन्यापैकी केवळ 4 सामने जिंकण्यास यश मिळाले होते. यानंतर, हार्दिकने टी -20  वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट खेळ दाखवून टीम इंडियाला चॅम्पियन बनविले. त्यानंतर चाहत्यांनी त्याची प्रशंसा केली.  मात्र आता क्वालिफायर 2 मध्ये झालेल्या पराभवानंतर हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here