‘शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे : मंत्री जयकुमार गोरे

0
IMG-20250531-WA0015.jpg

विजय ढालपे;दहिवडी : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी गोरगरीब जनता धाय मोकलून रडत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या, गोरगरीब जनतेच्या पाठीशी सरकार, प्रशासन ठामपणे उभे आहे, असा विश्वास ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी आजच्या नुकसान पाहणी दौऱ्यात अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा.
मागील आठवड्यात माण तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. घरांसह शेती, रस्ते, पूल यांची मोठी हानी झाली. या नुकसानीची प्रातिनिधिक पाहणी मंत्री गोरे यांनी केली.

या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार विकास अहिर, गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव व अमर नलवडे, म्हसवडचे मुख्याधिकारी‌ सचिन माने, कार्यकारी अभियंता युवराज देसाई, उपअभियंता बांधकाम विनोद येवले, तसेच अरुण गोरे, अर्जुन काळे, दादासाहेब काळे, बाळासाहेब कदम, किसन सस्ते, गणेश सत्रे, प्रशांत गोरड, सचिन मगर, अशोक बोराटे आदी उपस्थित होते.

मंत्री गोरे म्हणाले, ”हा पाऊस अनपेक्षित आहे. प्रचंड मेहनतीने आणलेल्या नगदी पिकावरच शेतकऱ्याचं वर्षभराचं आर्थिक नियोजन असतं. अतिवृष्टीने विशेषतः टोमॅटो, कांदा, डाळिंब या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी घरांचेही नुकसान झाले आहे. सरकारने सर्व प्रकारच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाईचा निर्णय घेतला आहे. सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा बांधावर जाण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.”

या वेळी कुळकजाई ते सीतामाई रस्त्याचे काम करताना साइडपट्टीचे काम न केल्याने ताई जाधव यांच्या घरात पाणी घुसून भिंत पडली, तसेच वस्तूंचे नुकसान झाले. या वेळी मंत्री गोरे यांनी संबंधित विभागावर ताशेरे ओढले, तसेच तालुक्यातील शिंदी खुर्द, कुळकजाई, श्रीपालवण,‌ मलवडी, आंधळी, परकंदी, परतवडी, टाकेवाडी, म्हसवड येथील नदी व ओढ्यावरील वाहून गेलेले पूल, घरात पाणी घुसल्याने झालेले नुकसान, तसेच शेतीचे नुकसान यांची पाहणी केली. पळशी येथे माणगंगा नदीवरील पुलावरून पुराच्या पाण्यात पडून मृत पावलेल्या नवनाथ पाटोळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले, तसेच भांडवली येथील टोमॅटो पिकाचे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here