पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच नेले चोरून लाखो रुपये

0
download (2).jpg

देवळाली प्रवरा /  प्रतिनिधी, 

           पेट्रोल पंपावर कामगार म्हणून असलेल्या तरूणाने पेट्रोल व डिझेल विकून आलेली लाखो रुपयांची रोख रक्कम तसेच स्वॅप मशीन चोरुन नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील टाकळीमियाॅ शिवारात दि. १ जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली. 

        शिरीष तुकाराम निमसे, वय ३५ वर्षे, हे राहुरी तालुक्यातील टाकळिमियाँ येथे राहत असुन त्यांचा टाकळिमियाँ ते राहुरी जाणारे रोडवर शंकर पार्वती या नावाने भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप आहे. आरोपी सागर साळूंके हा शिरीष निमसे यांच्या पेट्रोल पंपावर गेल्या एक वर्षापासुन कामगार म्हणून काम करत आहे. दि. १ जून रोजी सकाळी ८ वाजता कामावर आला होता. रात्री ११.३० मॅनेजरने त्याला दिवसभराचा हिशोब घेण्यासाठी बोलावले. त्यावेळी त्याचे दोन मित्र तेथे आले होते. तेव्हा आरोपी सागर साळूंके हा दिवसभर पेट्रोल व डिझेल विकून जमा झालेली दिड लाख रुपए रोख रक्कम व २५ हजार रुपए किंमतीचे स्वॅप मशीन असा एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाला. 

       शिरीष तुकाराम निमसे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सागर बाबासाहेब साळुंके, रा. वाघाचा आखाडा, ता. राहुरी, याच्यावर गुन्हा रजि. नं. ६२२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (४) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here