[ad_1]
भाजपचे आक्रमक नेते आणि विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांना पाच वर्षांपूर्वी कोरोना काळात शरद पवारांविरोधात केलेल्या एका वादग्रस्त विधानाप्रकरणी बारामती न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. 2020 मध्ये एका पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थाप
.
2020 मध्ये लॉकडाउन दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांवर टीकास्त्र सोडले होते. त्यात त्यांनी पवारांना “शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना” असे संबोधले होते. या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदवला होता.
या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन बारामती शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास पूर्ण करून त्यांना बारामती न्यायालयात हजर केले होते. प्रारंभी पडळकर यांनी जामीन घेतला होता, मात्र त्यानंतर समन्स बजावूनही ते न्यायालयात अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते.
कोर्टाने चार साक्षीदारांची साक्ष तपासली
या प्रकरणाची सुनावणी बारामती न्यायालयात सुरू होती. मंगळवार 3 जून रोजी चार साक्षीदारांची साक्ष तपासल्यानंतर न्यायालयाने निकाल दिला. पडळकर यांचे विधान हे विशिष्ट व्यक्तीस उद्देशून होते, कोणत्याही जात, धर्म किंवा सामाजिक गटाविरुद्ध नव्हते. त्यामुळे त्यातून जातीय तेढ, सामाजिक अशांतता वा हिंसाचार उसळलेला नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंद केले. त्यामुळे यामध्ये फौजदारी स्वरूपाचा गुन्हा सिद्ध होत नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.
नेमके काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असे माझे मत आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहेत आणि राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची कायम राहिली आहे आणि पुढेही चालू ठेवतील, असे गोपीचंद पडळकर म्हणाले होते. त्यांच्याकडे ना कुठली विचारधारा आहे, ना कुठला अजेंडा आहे, ना कुठले व्हिजन आहे. फक्त छोट्या छोट्या समूह गटांना भडकावायचे आपल्या बाजूला करणे, त्यांच्यावरच अन्याय करायची अशी त्यांची भूमिका आहे, अशी टीकाही पडळकर यांनी शरद पवारांवर केली होती. मला वाटत नाही ते धनगर आरक्षणाबाबत ते पॉझिटिव्ह असतील. त्यांना फक्त धनगर समजाच्या आरक्षणाचे राजकारण करायचे आहे, असेही ते म्हणाले होते.
[ad_2]