Video : सिक्ससाठी जाणाऱ्या बॉलला विकेटमध्ये बदललं, सॉल्टचा तो कॅच पाहून येईल सूर्याची आठवण

0

[ad_1]

IPL 2025 Final : आयपीएल 2025 चा फायनल सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करून पंजाब किंग्स समोर विजयासाठी 191 धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी पंजाबकडून मैदानात आलेल्या सलामी जोडीपैकी एका फलंदाजाचा अप्रतिम कॅच घेऊन आरसीबीच्या फिलिप सॉल्टने फलंदाजाला माघारी पाठवलं. सध्या या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

फायनल सामन्याचा टॉस पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने जिंकला. त्याने प्रथम गोलंदाजी निवडून आरसीबीला फलंदाजीचं आव्हान दिलं. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 190 धावा केल्या. तर पंजाबला आयपीएल विजयासाठी 191 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी पंजाब किंग्सकडून प्रभसिमरन सिंह आणि प्रियांश आर्याची जोडी आली. दोघांनी पंजाब किंग्सला चांगली सुरुवात करून दिली. परंतु पाचव्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर प्रियांश आर्याची विकेट गेली. 

फिलिप सॉल्टने घेतला अप्रतिम कॅच : 

प्रभसिमरन सिंह आणि प्रियांश आर्या या दोघांनी पंजाब किंग्सला चांगली सुरूवात करून दिली होती. चौथी ओव्हर टाकण्यासाठी जॉश हेजलहूड आला. त्याने टाकलेल्या ओव्हरच्या सहाव्या बॉलवर प्रियांश आर्याने शॉट खेळला. त्याच्या बॅटमधून निघालेला शॉट सिक्सच्या दिशेनं जात होता, मात्र तेवढ्यात आरसीबीकडून फिलिप सॉल्टने जबरदस्त फिल्डिंग करून कॅच पकडला. हा कॅच पाहून अनेकांना सूर्यकुमार यादवच्या त्या कॅचची आठवण आली जो कॅच त्यानं वर्ल्ड कप 2024 च्या फायनलमध्ये पकडला होता. 

पाहा व्हिडीओ : 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेईंग 11 : 
फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकिपर), रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेजलवुड

 

पंजाब किंग्सची प्लेईंगची मॅचसाठी 11 : 
प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (विकेटकिपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, अजमातुल्ला ओमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार व्यास, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here