[ad_1]
शक्तिपीठ बाधित नाझरे, वझरे (ता. सांगोला) येथील शेतकऱ्यांची बैठक घेऊन शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी केली. नाझरे येथील खंडोबा मंदिर व वझरे येथील अंबाबाई मंदिरात सभा संपन्न झाली. यात एकच जिद्द शक्तिपीठ रद्द, अशा घोषणा देऊन, शक्तिपीठ रद्द करण्याच
.
या वेळी शेतकरी म्हणाले, शक्तिपीठासाठी नाझरे येथून चार किमी अंतरावर समांतर रोड असताना हा नवीन रोड काढून ठेकेदारांना जगवण्याचा महाराष्ट्र शासनाचा हेतू चांगला नाही. या अगोदरचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोड होणार नाही, असे सांगितले. परंतु सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी व शासनाने शेतकऱ्यांचा विरोध असताना हा मार्ग रेटण्याची गरज काय आहे. या वेळी डॉ. सोनवणे, शिक्षक नेते दादासो वाघमोडे, हरिश्चंद्र बनसोडे, दत्तात्रय पाटील, गंगाधर जोंधळे, रविराज शेटे आदींनी हा मार्ग सरकारने रद्द करावा, असे या वेळी सांगितले. या वेळी बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जमीन आमची आई, जमीन देऊन आम्ही खायचे काय? तुम्ही सांगा शक्तिपीठ महामार्गासाठी येथील कसदार जमिनी जाणार आहेत. जमीन आमची आई आहे. आईस आम्ही विकणार नाही. तसेच यावर आमची रोजी रोटी आहे. जमिनी देऊन आम्ही खायचे काय? असा सवाल नाझरे-वझरे येथील शेतकऱ्यांनी केला.
[ad_2]