Axar Patel announces retirement from cricket after IPL 2025 real or fake know fact check | Axar Patel Retirement: “माझा क्रिकेटचा प्रवास इथपर्यंतच…” अक्षर पटेलने घेतली निवृत्ती? रिटायरमेंटचा Video Viral

0

[ad_1]

Fact Check Axar Patel Retirement: दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधार आणि भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये अक्षर एक भावनिक भाषणात देताना दिसतो, तो बोलतो “खूप महत्त्वाची घोषणा… क्रिकेटने मला सर्व काही दिलंय. ओळख, तुमचं प्रेम. पण प्रत्येक प्रवासाला एक शेवट असतो आणि माझा आणि क्रिकेटचा प्रवास बहुतेक इथवरच होता.”

अक्षर पटेलने घेतली निवृत्ती 

या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. काही क्षणातच अक्षर पटेलने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याच्या चर्चा रंगल्या. आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत असलेला अक्षर अचानक निवृत्त होतोय, ही बाब अनेकांना धक्कादायक वाटली. पण खरच असच झालं आहे का? या व्हायरल व्हिडीओमागचं नक्की काय सत्य आहे? चला जाणून घेऊयात…

हे ही वाचा: माझ्या मुलीला पाहिलंत का? एक फोटो, एक प्रश्न आणि तुटलेल्या आशा, चेंगराचेंगरीत मुलगी हरवलेल्या बापाला अश्रू अनावर

 

 

व्हिडीओमागचं नक्की सत्य काय? 

व्हिडीओमध्ये जे सांगितलं जात आहे ते खरं आहे की नाही याबद्दल तपासणी करण्यात आली. तेव्हा लक्षात आलं की हा व्हिडीओ खरा नसून AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने बनवलेला आहे. अक्षर पटेलने स्वतः कुठेही निवृत्तीबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य दिलेलं नाही. ना त्याच्या सोशल मीडिया हँडल्सवर अशी कोणतीही पोस्ट आहे, ना बीसीसीआयने याबाबत कोणतीही पुष्टी केली आहे.

हे ही वाचा: IPL ट्रॉफीची किंमत किती असते माहितेय? झळाळती ट्रॉफी खरंच सोन्याची असते का? किंमत ऐकून व्हाल थक्क

 

गेल्या महिन्यात विराट कोहली आणि रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यांनी गेल्यावर्षीच टी-20 फॉरमॅटला अलविदा केला होता. त्यानंतर अक्षर पटेल हा टी-20 संघातील सीनियर खेळाडूंपैकी एक मानला जातो. सोशल मीडियावर फिरणारा रिटायरमेंटचा व्हिडीओ खोटा असून, अक्षर पटेल अजूनही क्रिकेट खेळत आहे. अशा फेक व्हिडीओपासून सावध राहणं आणि अधिकृत खात्यांचीच माहिती खऱ्या मानणं हे काळाची गरज आहे. 

हे ही वाचा: क्रिकेटर रिंकूची जीवनसाथी होणारी प्रिया सरोज कोण आहे आणि ती काय करते? जाणून घ्या

 

आयपीएल 2025 मध्ये अक्षरचा संघ पाचव्या स्थानावर

आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सला पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. तरीसुद्धा अक्षर संघाचं नेतृत्व करत होता. इतकंच नव्हे तर सध्या तो भारतीय टी-20 संघाचा उपकर्णधार देखील आहे.



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here