[ad_1]
पुण्यातील हिंजवडी येथून एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका 25 वर्षीय आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या तरुणीने 21 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. माझी जगायची इच्छा संपली आहे, अशी चिठ्ठी लिहून या तरुणीने आपले आयुष्य संपवले. या घटनेमुळे परि
.
अभिलाषा भाऊसाहेब कोथंबिरे (वय 25) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ती आयटी अभियंता म्हणून हिंजवडी आयटी पार्कमधील एका खासगी कंपनीत कार्यरत होती. तिची एक मैत्रीण द क्राऊन ग्रीन सोसायटीमध्ये राहत होती. 31 मे रोजी पहाटे 4.30 वाजता अभिलाषा दुचाकीवरून ‘द क्राऊन ग्रीन’ या सोसायटीत आली. लिफ्टने ती थेट 21 व्या मजल्यावर गेली. पहाटे सुमारे 4.45 च्या सुमारास तिने उडी मारून जीवन संपवले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालात अभिलाषाच्या अनेक अवयवांवर गंभीर इजा झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
रूमध्ये आढळली सुसाईड नोट
पोलिसांनी रूमची पाहणी केली असता, अभिलाषाने लिहिलेली सुसाईड नोट मिळाली. सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे, असे तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलेले आढळून आले. तिच्या पलंगावर रक्ताचे डाग असलेले नॅपकिन, इनर, उशीचे कव्हर आणि मोबाइलही पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी अभिलाषाच्या मृत्यूची आकस्मिक नोंद केली असून, या घटनेत कोणत्याही प्रकारचा घातपात अथवा संशयास्पद काही संकेत आढळून आले नसल्याचे म्हटले आहे.
अभिलाषाची मैत्रीण काय म्हणाली?
अभिलाषा हिच्यासोबत राहत असलेल्या तिच्या मैत्रिणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा रात्री एक वाजेपर्यंत रूममध्ये होती. त्यानंतर मी सकाळी पाच वाजता उठले असता ती रूममध्ये दिसली नाही. त्यावेळी बाथरूम भिंतीवर रक्ताचे पुसट डाग दिसले. परंतु, त्याबाबत लक्षात आले नाही. त्यानंतर मी पुन्हा सकाळी दहा वाजता उठले असता, अभिलाषा रूममध्ये आली नव्हती. त्यामुळे तिच्याशी संपर्क करत होते. परंतु, तिचा फोन बंद होता त्यामुळे संपर्क झाला नाही. काही वेळाने पोलिसांकडून मला या घटनेबाबत समजले. त्यानंतर आम्ही पुन्हा रूमची पाहणी केली असता अभिलाषा हिच्या बेडवर नॅपकिन व इनरवर रक्ताचे डाग दिसून आले, असे अभिलाषाच्या मैत्रिणीने पोलिसांना सांगितले.
हे ही वाचा…
मुंबईच्या आर सिटी मॉलमधील तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी:रक्ताच्या थारोळ्यात पडला तरुण, नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय; तपास सुरू
मुंबईच्या घाटकोपर परिसरातील आर सिटी मॉलमध्ये सोमवारी एका व्यक्तीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आयुष्य संपवले आहे. मृत व्यक्तीचे नाव दीपक जोशी असे असून त्यांचे वय 38 वर्ष होते. दीपक यांनी मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, या घटनेने मॉलमध्ये एकच खळबळ उडाली होती. पूर्ण बातमी वाचा…
[ad_2]