Return my son body without postmortem Father Makes A Request after Bengaluru Stampede in RCB Victory celebration Parade | “माझा मुलगा मला परत द्या, त्याच्या शरीराचे तुकडे करू नका…” चेंगराचेंगरीत मृत पावलेल्या मुलाच्या बापाने फोडला टाहो

0

[ad_1]

RCB Victory Parade Tragedy: 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर RCB ने आयपीएल ट्रॉफी जिंकली. हा विजय त्यांच्या लाखो चाहत्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरला. ते सगळेच जल्लोषात रंगून गेले होते. पण, त्याचवेळी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेली ही गर्दी काहींच्या आयुष्यात कायमची जखम करून गेली. स्टेडियमबाहेर बुधवारी संध्याकाळी झालेल्या भयावह भगदाडात ११ जणांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये एक वडीलांने त्याचा एकुलता एक मुलगाही गेला. त्या वडिलांचा आवाज आज संपूर्ण देशाला सुन्न करून गेला. 

एकुलता एक मुलगा होता… 

आपला मुलगा अचानकच निघून गेला यावर त्या वडिलांना विश्वास बसत नव्हता. ते म्हणाले  “तो मला न सांगता स्टेडियमला गेला होता…आता मुख्यमंत्री येतील, उपमुख्यमंत्रीही येतील, पण माझा मुलगा कुणी परत आणू शकत नाही.” याशिवाय त्यांनी त्याच्या मुलाचे पोस्टमॉर्टम करू नका अशी मागणीही केली आहे. “किमान त्याचा मृतदेह मला द्या. पोस्टमॉर्टम करू नका. त्याच्या शरीराचे तुकडे करू नका,” बेंगळुरूमध्ये आपल्या मुलाला गमावलेल्या वडिलांनी रडत रडत विनंती केली. 

हे ही वाचा: Axar Patel Retirement: “माझा क्रिकेटचा प्रवास इथपर्यंतच…” अक्षर पटेलने घेतली निवृत्ती? रिटायरमेंटचा Video Viral

 

नेमकं काय घडलं?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB)  च्या विजयानंतर चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची गर्दी उसळली होती. खेळाडू येण्यापूर्वीच स्टेडियम फुल झालं होतं. अपेक्षेपेक्षा आणि स्टेडियमची कॅपिसिटी नाही तेवढे लोक तिकडे आले होते. बाहेर उभ्या असलेल्या हजारो चाहत्यांनी आत जाण्याचा प्रयत्न सुरू केला, त्यामुळे सुरक्षेने गेट बंद करण्यात आला. पण तरी जमलेली गर्दी हटायला तयार नव्हती. या जमलेल्या गर्दीने गेट ढकलण्याचा प्रयत्न, भिंतीवर चढणे, झाडांवरून आत येण्याचे अयशस्वी प्रयत्न सुरू केले. पोलिसांनी लाठीचार्ज केला, आणि याच गोंधळात गर्दीने आपला ताबा गमावला.

हे ही वाचा: माझ्या मुलीला पाहिलंत का? एक फोटो, एक प्रश्न आणि तुटलेल्या आशा, चेंगराचेंगरीत मुलगी हरवलेल्या बापाला अश्रू अनावर

 

स्लॅब कोसळल्यानं आणखी मोठी दुर्घटना

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टेडियम परिसरात असलेल्या एका नाल्यावर ठेवलेला तात्पुरता स्लॅब चाहत्यांच्या वजनामुळे कोसळला. त्यावर उभे असलेले अनेक जण थेट नाल्यात कोसळले. त्यातूनच प्रचंड गोंधळ आणि चेंगराचेंगरी झाली. लोक एकमेकांवर पडले, काहींना जखमा झाल्या, तर काहींचा श्वास गुदमरला.

हे ही वाचा: राजीव शुक्ला होणार BCCIचे अध्यक्ष, रोजर बिन्नींचा कार्यकाल लवकरच संपणार

 

11 जणांचा दुर्दैवी मृत्यू, अनेक गंभीर जखमी

या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी आहेत. बेशुद्ध अवस्थेत अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांमध्ये कॉलेज युवक आणि महिला देखील आहेत. सर्व मृतांचे शवविच्छेदन पूर्ण झाले असून, त्यांच्या नातेवाईकांना मृतदेह सोपवण्यात आले आहेत.



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here