Laxman Hake Criticizes DCM Ajit Pawar Again in Parbhani Gangakhed | पैसे कमावण्याचा उद्देश, तर व्यवसाय करा: अजित पवारांवर सरंजामशाहीचे आरोप, लक्ष्मण हाकेंचा पुन्हा एकदा हल्लाबोल – Parbhani News

0

[ad_1]

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांचा पैसे कमावणे हाच त्यांचा एकमेव उद्देश असल्याची टीका हाके यांनी केली आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाच्या भेटीदरम्य

.

अजित पवारांचा पक्ष हा सरंजामशाहीचा पक्ष असल्याचा आरोप करत हाके म्हणाले, अजित पवारांना आचार, विचार, ध्येयधोरण यांच्याशी काही देणेघेणे नाही. त्यांचा एकमेव उद्देश म्हणजे सत्तेत राहून पैसे कमावणे. जर पैसेच कमवायचे असतील, तर त्यांनी एखादा व्यवसाय करावा, असा खोचक सल्लाही हाके यांनी दिला आहे.

दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी यापूर्वीही अजित पवारांवर आरोप केले असून, हे वाद आता अधिक उग्र होत चालले आहेत. ओबीसी वसतीगृहसाठी अजित पवारांनी एक रुपयाही दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. सामाजिक न्याय आणि अजित पवार यांचा संबंध नसल्याचेही हाके म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण हाके हे अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. मागील दोन ते तीन दिवसाखाली देखील हाकेंनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. अजित पवार हे शरद पवारांच्या ‘रिचार्ज’वर चालायचे. आता त्यांना पंख फुटले आहेत असे समजतेय. पण ते मूळचे पोल्ट्री फार्मवाले आहेत. त्यांनी ओबीसी समाजाचा निधी अडवला.

लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावरही टीकेची झोड उठवली. अजित पवारांचा मुलगा निवडणुकीत पडला. पार्थ पवार यांना पुन्हा राजकारणात आणता आलं नाही. त्याला पडलेल्या मतावरुन त्याची लायकी शोधायची का असा प्रश्न लक्ष्मण हाकेंनी केला होता.

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here