कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगांव येथील श्रीमंत महामहीम पवार सरकार संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थान वतीने गंगा दशहरा निमित्ताने कोपरगावातील गोदा तीरावर गंगा-गोदावरी पुजन संत रामदासी बाबा भक्त परिवाराचे सौ. शोभादेवी आणि श्री शरदनाना थोरात या उभयतांच्या शुभहस्ते जेष्ठ शुध्द दशमी शके १९४७ तिथीनुसार गंगा दशहरा साजरा करण्यात आला आहे.
प्रभु श्रीराम यांचे पुर्वज राजा सगर यांचे पुत्रांना कपिल मुनींच्या शापातून मुक्ती साठी भगिरथाने घोर तपश्चर्या केली. ब्रम्हदेव आणि शिवशंकर यांनी भागिरथाला प्रसन्न होवुन जेष्ठ शुध्द दशमीला हस्त नक्षत्रात गंगा पृथ्वीवर अवतरली होती. गंगाजलाने राजा सगर यांचे पुत्रांना मुक्ती मिळाली. म्हणून गंगाजल, गंगा स्नानाला विशेष महत्त्व आहे.
सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने वार्षिक सण- उत्सवात “गंगा दशहरा” उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. याही वर्षी सोमेश्वर महादेव शिवमुखावर गंगा-गोदावरी जलाभिषेक गोदातीरावर करण्यात आला. त्यानंतर पुजा करुन शिवमुखाची शंखनाद सवाद्य मिरवणूक गांवठाणातून संपन्न झाली. गंगा-गोदावरी ओटी भरणे, संकल्प अभिषेक आणि सोमेश्वर शिवलिंगावर आंबा फळ सजावट करण्यात आली होती.
गंगा दशहरा निमित्ताने जेष्ठ प्रतिपदा ते दशमी पर्यंत सलग दहा दिवस सकाळी सोमेश्वर शिवलिंगावर काशी जलाभिषेक पुजा करण्यात आली होती. पौरोहित्य प्रदिपशास्री पदे, प्रशांत स्वामी जंगम, नंदू शेंडे गुरव यांनी केले आहे. सोमेश्वर महादेव शिवलिंग आंबा फळ, बेल आणि विविध फुलांनी सजविण्यात आले…
सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके यांनी यजमान यांचे टोपी, उपरणे, श्रीफळ आणि प्रसाद देवून स्वागत केले…