[ad_1]
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आज, गुरुवारी जिल्हा परिषदेच्या वतीने ‘एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेवर आधारित वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
.
यावेळी सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपल्या आईच्या सन्मानार्थ एक वृक्ष लावून पर्यावरण संवर्धनाबाबत सामाजिक बांधिलकी व्यक्त करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या परिसरात अनेक झाडे लावण्यात आलीय यावेळी जि.प. च्या अतिरिक्त सीइओ तथा डीआरडीएच्या प्रकल्प संचालक प्रीती देशमुख, डेप्युटी सीईओ बालासाहेब बायस, मुख्य लेखा व वित्त अधिकारी (कॅफो) दिनेश ठाकरे, कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरुषोत्तम सोळंके, शिक्षणाधिकारी अरविंद मोहरे व प्रिया देशमुख, कृषि विकास अधिकारी मलप्पा तोडकर, प्रभारी डेप्युटी सीईओ सुनील गवई, संजय खारकर, अभियंता प्रमोद कराळे, पल्लवी मांडवगडे, प्रशासन अधिकारी निलेश तालन, विजय कविटकर, गजानन पाचपोर, दिनेश तांबडे, सीइओंचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर घाटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनासोबतच आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा अभिनव प्रयत्न जिल्हा परिषदेच्या वतीने सुरु करण्यात आला असून तो यापुढेही कायम केला जाणार आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
[ad_2]