Virat Kohli Sister Replied on Quoestion on Relatioship With Anushka Sharma

0

[ad_1]

Virat Kohli’s Sister And Anushka Sharma Relationship: IPL 2025 ची फायनल मॅच ही सगळ्यांसाठी खास ठरली. कारण 18 वर्षांत पहिल्यांदाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनी बाजी मारली आहे. यंदाच्या वर्षी या टीमनं जणू इतिहास रचला आहे. त्यामुळे हा विजय विराट आणि संपूर्ण टीमसाठी खूप खास आहे. कारण 18 वर्षांत्या काळानंतर त्यांनी पहिल्यांदा आयपीएल विजेत्याची ट्रॉफी उचलली आहे. मॅचनंतर विराट आणि अनुष्का मैदानात दिसले आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीनं सगळ्यांची मने जिंकली. 

सोशल मीडियावर विराट आणि अनुष्काचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पण यानंतर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. लोकांचं म्हणणं आहे की विराट कोहलीनं त्याच्या या महत्त्वाच्या विजयानंतर त्याची बहीण भावनाचा उल्लेख केला नाही कुटुंबातील कोणत्या व्यक्तीचा. काही नेटकऱ्यांनी विराटच्या बहिणीला घेऊन कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. या कमेंट्समधून प्रश्न विचारण्यात आला आहे की विराट किंवा अनुष्काचे त्याच्या कुटुंबासोबत चांगले संबंध नाहीत. 

खरंतर, IPL 2025 विजयानंतर विराट कोहलीच्या बहिणीनं एक भावनिक पोस्ट शेअर केली. पण काही लोकांनी भावा-बहिणीच्या नात्यावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. काही नेटकऱ्यांनी अनुष्का शर्मासोबत विराटच्या बहिणीच्या नात्याविषयी बोलण्यास सुरुवात केली. त्यांचं म्हणणं आहे की भावनाच्या पोस्टवर विराट आणि अनुष्का दोघांपैकी कोणीही काही प्रतिक्रिया दिली नाही. विराटच्या बहिणीनं लिहिलं की ‘ही रात्र आणि हा क्षण खास आहे. जेव्हा आपण सगळे हे स्वप्न पूर्ती झाली याचा आनंद साजरा करतोय. पण या आधी त्यानं कधी रडवलं तर कधी हसवलं आहे. विराटचा हा प्रवास खूप मोठा आणि संघर्षानं भरलेला होता. आता जेव्हा हे स्वप्न पूर्ण झालं आहे तेव्हा प्रत्येक क्षणाचा जाणीव झाली आहे.’

भावनानं पुढे लिहिलं की ‘आम्ही विराटच्या या पोलायटनेस आणि चाहत्यांकडून देण्यात येणाऱ्या प्रेमाला शब्दांमध्ये मांडू शकत नाही. हा विजय फक्त त्याचा नाही तर प्रत्येक व्यक्तीचा आहे जो RCB शी जोडलेला आहे. माझा छोटा भाऊ, तू खरंच देवानं पाठवलेला देवदूत आहेस, जो लाखो लोकांसाठी प्रेरणा स्थळ ठरला आहे. कोणाला तरी तुला वरून पाहून नक्कीच अभिमान वाटत असेल.’

हेही वाचा : समांथामुळे चाहत्यांचा जीव धोक्यात? Fake मेडिसीन प्रकरणाशी अभिनेत्रीचं कनेक्शन; डॉक्टर म्हणाले, ‘फ्रॉड…’

भावनानं शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘भाषण देताना विराट कधीच तुझा उल्लेख करत नाही. ना कधी तुझी पोस्ट लाईक करतो आणि ना कधी अनुष्का काही बोलते.’ या नेटकऱ्याला उत्तर देत भावना म्हणाली, ‘देवानं तुला बुद्धी द्यावी की प्रेम दाखवलंच पाहिजे असं नाही. हे अनेक पद्धतीनं अस्तित्वात असतं. जसं ईश्वरासाठी असलेलं आपल प्रेम हे दिसत नाही, पण असतं.’



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here