Sambhajiraje Chhatrapati Shivaji Coronation Day Ceremony Update | Raigad Waghya Dog Samadhi Controversy | रायगडावर केवळ पोषक गोष्टीच राहतील: संभाजीराजे छत्रपती यांची ग्वाही; वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची केली होती मागणी – Mumbai News

0

[ad_1]

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी पुन्हा एकदा रायगडावर रायगडाला पोषक असणाऱ्या गोष्टीच राहतील असे ठणकावून सांगितले आहे. रायगडावर रायगडाला पोषक असणाऱ्या गोष्टीच राहतील. हा माझा शब्द आहे. पण अतिक्रमण काढत असतान

.

रायगडावर आज तारखेनुसार शिवराज्याभिषेकाचा सोहळा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना दुग्धाभिषेक केला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी रायगडावर रायगडाला पोषक असणाऱ्या गोष्टीच राहतील असा पुनरुच्चार केला. आजचा शिवराज्याभिषेक सोहळा आनंदाचा असून सुवर्णक्षण आहे. त्यामुळे रायगडावर रायगडाला पोषक आहेत त्याच गोष्टी राहणार हा माझा शब्द आहे. पण हे अतिक्रमण काढत असताना माझे संरक्षण येथील धनगर समाजाला असणार आहे.

ज्या ठिकाणी हजार-दोन हजार लोक यायचे, तिथे आज लाखो लोक येत आहेत. एवढा शिस्तभक्त शिवभक्त… कोणताही कायदा हातात न घेणारा हा शिवभक्त आहे. मला आयजी व एसपीने ही शिस्त कशी निर्माण होते? असा प्रश्न दिला. त्यावर मी त्यांना हे शिवभक्तांवर असणारे संस्कार आहेत, असे ते म्हणाले.

संभाजीराजेंचा वाघ्या कुत्र्याच्या समाधीला विरोध

उल्लेखनीय बाब म्हणजे संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याची हटवण्याची मागणी केली आहे. या श्वानाने शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या चितेत उडी घेऊन मृत्युला कवटाळल्याची आख्यायिका आहे. पण संभाजीराजे यांनी इतिहासात अशा कोणत्याही घटनेचा उल्लेख नसल्याचा दावा केला आहे. ते यासंबंधी आपली ठाम भूमिका मांडताना म्हणाले होते, हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही.

भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे.

समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे.

कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. 31 मे 2025 अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे, याकरिता मुख्यमंत्री महोदयांकडे पत्र लिहून मागणी केली.

भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार 100 वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस 100 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे, असे ते म्हणाले होते.

हे ही वाचा…

ED कार्यालयाला लागलेल्या आगीचा भुजबळांना फटका:पासपोर्ट भिजला – फाटला, 27 एप्रिलला लागली होती आग; परदेश दौऱ्यास मुदतवाढ

मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाच्या मुंबई स्थित कार्यालयाला आगीत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या पासपोर्टचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोर्टाने त्यांना परदेश दौऱ्यासाठी 12 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. वाचा सविस्तर

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here