IPL 2025 RCB Win stampede outside Bengaluru Chinnaswamy Stadium former Indian Cricketer React Metion Virat Kohli Factor

0

[ad_1]

IPL 2025 Stampede Outside Bengaluru Chinnaswamy Stadium: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू किंवा विराट कोहलीबरोबरच सर्व आरसीबीच्या खेळाडूंच्या आयपीएल जेतेपदाच्या आनंदावर 4 जून रोजी घडलेल्या घटनेमुळे विर्जण पडलं. कोली आणि आरसीबीच्या संघाने तब्बल 18 वर्षानंतर आयपीएलची ट्रॉफी जिंकली. यानंतर आपल्या चाहत्यांबरोबर आनंद साजरा करण्यासाठी आरसीबीचा संघ अहमदाबादमधून थेट बंगळुरुला पोहोचला. मात्र पुढील काही तासांमध्ये चिन्नस्वामी स्टेडियमबाहेर जे काही घडलं ते फारच धक्कादायक होतं. आरसीबीच्या संघाला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये 11 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. 47 जण यामध्ये जखमी झाले. मात्र असं असतानाही मैदानातमध्ये सोहळा सुरुच ठेवण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन विराट आणि आरसीबीवर टीकेची झोड उठली आहे. 

तातडीने व्यक्त केला शोक

चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेरच्या चेंगराचेंगरीमुळे आरसीबीच्या आयपीएल विजयाच्या उत्साहाला डाग लागला. मात्र बाहेर लोकांचे जीव जात असताना गोंधळ उडालेला असताना मैदानात सत्कार समारंभ सुरू करण्याच्या संघाच्या आणि आयोजकांच्या निर्णयावर टीका केली जात आहेत. एकीकडे या चेंगराचेंगरीचे  भयानक व्हिडिओ समोर येत आहेत. ज्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याचं आणि अनेकांना जखमी अवस्थेत उचलून नेलं जात असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे यावरुन आरसीबीला लक्ष्य केलं जात आहे. विराटही टीकेचा धनी ठरत आहे. या दुर्घटनेची तीव्रता लक्षात येताच, कोहलीसहीत आरसीबीने अधिकृत पत्रक जारी करत तातडीने शोक व्यक्त केला. तरीही त्यांच्यावर टीका होत असतानाच एका माजी वेगवान गोलंदाजाने विराटची आणि आरसीबीची पाठराखण केली आहे.

आसा उत्साह कोणत्याही संघाबद्दल नाही

माजी भारतीय वेगवान गोलंदाज अतुल वासनने चिन्नस्वामीमध्ये घडलेल्या प्रकरणासाठी खेळाडूंना दोषी ठरवू नये असं म्हटलं आहे. आरसीबीच्या विजयासंदर्भातील अभूतपूर्व उत्साह पाहून अतुल वासन थक्क झाला आहे. मागील नऊ आयपीएल विजेत्या फ्रँचायझींपैकी कोणत्याही संघाबद्दल चाहत्यांमध्ये असा उत्साह दिसून आला नव्हता. खेळाडूंमुळे नव्हे तर चाहत्यांच्या उन्मादामुळे बेंगळुरूमध्ये विचित्र चेंगराचेंगरीची दुर्घटना घडल्याचं अतुल वासनचं म्हणणं आहे.

लोकांनी विराटवर विश्वास ठेवला

“जे घडलं ते फार दुःखद आहे. ते सारं माझ्या डोळ्यांसमोर घडले कारण काल ​​रात्रीपासून मी सामन्यानंतर शोच करत आहे. मी विराटच्या चेहऱ्यावर विजयानंतर एकप्रकारचा दिलासा आणि उत्साह पाहिला. मला ते स्पष्ट दिसत होते. त्याने 2016 मध्ये आयपीएलचा अंतिम सामना पराभूत झाल्यानंतर स्पष्ट केले होते की तो त्याच्या कारकिर्दीमधील सर्वात वाईट क्षणांपैकी एक होता. म्हणून मला वाटते की आज चाहते यात सामील झाले. त्यांनी विराटच्या या कथेवर विश्वास ठेवला की ही खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा विराटला अनुष्का आणि सर्वांसह अखेर हे यश मिळाले तेव्हा मला वाटते की चाहतेही वेडे झाले,” असं वासनने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

गर्दी केवळ विराटमुळेच

“पण दुसऱ्या दिवशी जे घडले त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. त्या वेळी अतिउत्साहामुळे ज्या प्रकारचा उन्माद झाला तो थक्क करणारा आहे. मी ते सारं पाहत होतो. एक स्थानिक फ्रँचायझी इतकी प्रसिद्धी कशी मिळवू शकते? याचं विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न करत होतो कारण विराट 18 वर्षांपासून त्यांच्यासोबत राहिला आहे. कदाचित त्याला सर्व काही मिळाले असेल, परंतु त्याला कदाचित असे वाटले असेल की खेळात या फ्रँचायझीसह आपल्याला यश मिळालं तर ते चाहत्यांसोबत शेअर करावं. म्हणून मला वाटते की ही गर्दी फक्त विराट फॅक्टरची आहे, विराटशी असलेले कनेक्शन जे चाहत्यांना जगभरात कुठेही आकर्षित करते,” असंही वासन म्हणाला. 

विश्वचषक जिंकला तसा उत्साह होता

वासनने आरसीबीच्या आयपीएल विजयासंदर्भात असलेल्या उत्साहाची तुलना भारताच्या विश्वचषक विजयाला मागे टाकणारी आहे अशा शब्दांमध्ये केली. आयपीएल आणि फ्रँचायझींच्या उत्कृष्ट मार्केटिंगचं हे उदाहरण असल्याचं वासन म्हणाला. स्थानिक स्पर्धा असूनही एनएफएल किंवा एनबीए सारख्या अमेरिकन खेळांनी “वर्ल्ड सिरीज” म्हणून संबोधित केले तरी त्याची अशी क्रेझ नसल्याचं वासनने म्हटलं. राजकारणी नव्हे तर या विजयाभोवती असलेल्या अतीउत्साहामुळे बेंगळुरूमध्ये हा अपघात झाला, असा युक्तिवाद वासनने केला.

‘…म्हणून खेळाडूंना दोष देऊ नये’

एवढ्या मोठ्या संख्येने गर्दी जमवण्यासाठी सामान्यतः जेवण किंवा भेटवस्तू देणे यासारखे मोठे खर्च करावे लागतात. मात्र बंगळुरुमधील गर्दी हा एक उत्स्फूर्त उद्रेक होता. ज्यामुळे फ्रँचायझींना मोफत प्रसिद्धी मिळाली, असं वासन म्हणाला. खेळाडू फक्त 18 वर्षांपासून त्यांना पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांसोबत उत्सव साजरा करत होते म्हणून खेळाडूंना दोषी ठरवता येणार नाही, असं वासन म्हणाला. त्यांचा निष्ठावंत आधार असलेल्या चाहत्यांच्या प्रेमाची परतफेड करण्याचा त्यांचा उद्देश होता, असं वासनने खेळाडूंची बाजू घेताना म्हटलं आहे. 

…तर ते बाहेर पडले असते

“विराट चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाची परतफेड करत होता. लोक बाहेर मरत आहेत असं माहिती असतानाही मैदानात विराट स्वत:चा सत्कार करुन घेतोय असं मला लाखो वर्ष सांगितलं तरी विश्वास बसणार नाही. मी त्याला लहानपणापासून एक व्यक्ती म्हणून ओळखतो. राजकारण्यांबद्दल या संदर्भात मी एकवेळेस मान्य करु शकतो कारण ते निर्दयी आणि गेंड्याच्या कातडीचे असतात. जे भाडोत्री आहेत आणि कॉर्पोरेट आहेत किंवा अगदी आरसीबीची फ्रँचायझी आहे त्यांना काही फरक पडत नाही कारण त्यांना शेवटी बॅलन्स शीट दाखवायची आहेत. त्यांना महसूल दाखवावा लागतो. त्यांना कळलेच नाही बाहेर काय सुरु आहे त्यामुळे हा प्रकार संवादाचा अभाव आहे. खेळाडूंना कळेपर्यंत फार उशीर झाला होता आणि त्यानंतर त्यांना यात काही बोलायचे नव्हते. जर त्यांना तसे वेळेत कळले  असते तर ते लगेचच मैदानातून बाहेर पडले असते,” असे माजी वेगवान गोलंदाजाने खेळाडूंची बाजू मांडताना म्हटलं.



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here