‘बनपुरी खूनप्रकरणी चौघांना अटक’; वडूज पोलिसांची कारवाई,

0

संशयितांना २७ जूनपर्यंत कोठडी

सातारा : बनपुरी (ता. खटाव) येथे दुचाकी वाहनाला झालेल्या अपघातात नुकसान भरपाई देण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत मोटारचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अक्षत विलास देवकर, प्रसाद अंकुश देवकर, भावेश कुंडलिक देवकर, उदय सदाशिव तुपे (रा.बनपुरी, ता. खटाव) या चार संशयितांना आज पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यांना वडूज येथील न्यालयात हजर केले असता त्यांना २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

यामध्ये संजय पांडुरंग कर्चे (वय ५५, रा. पिंपरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) या मोटारचालकाचा मृत्यू असून, अज्ञातांविरुद्ध वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याबाबत तपासासाठी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली होती. पोलिस निरीक्षक घनशाम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक विक्रांत पाटील व अंमलदार पोलिस उपनिरीक्षक आर. बी. कांबळे यांनी संशयितांची माहिती घेऊन अक्षत देवकर, प्रसाद देवकर, भावेश देवकर, उदय तुपे या चौघांना शिताफीने अटक केली.

संशयितांना न्यायालयात हजर केले असता २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.या कारवाईत पोलिस उपअधीक्षक अशिनी शेंडगे, पोलिस निरीक्षक घनशाम सोनवणे, सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत पाटील, पोलिस उपनिरीक्षक आर. बी. कांबळे, अमित शिंदे, रणधीर कर्चे, हवालदार अमोल चव्हाण, मल्हारी हांगे, किरण चव्हाण आदींनी सहभाग घेतला होता. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here