वाई : एकसर (ता. वाई) येथील पुलावरून रिक्षा ओढ्यात कोसळून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला. विशाल मुगुटराव कळंबे (वय ३७) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. वाईकडून एकसरच्या दिशेने जात असताना सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली.
रात्री घटना लक्षात न आल्यामुळे सकाळी नागरिकांनी रिक्षा व मृतदेह पाहिल्यानंतर गावातील युवकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विशाल कळंबे यांचा मृतदेह ओढ्यातून बाहेर काढला. त्यांच्या मागे मोठा भाऊ, विवाहित बहीण व आई असा परिवार आहे.