सातारा : राजर्षी शाहु महाराज यांनी कठोर भूमिका घेत समाजातील सर्व बहुजनांना कायदा करून न्याय दिला.असे प्रतिपादन सिने अभिनेते किरण माने यांनी केले.
राजर्षी शाहु महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन म्हणून येथील शाहुनगरच्या छ.राजर्षी शाहु चौक येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.तेव्हा किरण माने मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक नेते विजय निकम होते.
राजर्षी शाहु महाराज यांचे भिंतीवरील शिल्प तयार करण्यासंदर्भात मान्यवरांनी चर्चा-विनिमय करण्यात आला. सुहास पुजारी यांनी प्रास्ताविक केले.अनिल वीर यांनी सूत्रसंचालन केले.सचिन मोरे यांनी आभार मानले.पी.टी. कांबळे यांनी पेढे वाटुन अभिवादन केले.प्रथमतः नामफलकावरील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. सदरच्या कार्यक्रमास शिरीष जंगम, शामराव बामसोडे, चंद्रकांत खंडाईत,गणेश कारंडे, आनंदराव काटकर,मानसी निकम,विवेक मस्के आदी विविध क्षेत्रातील मान्यवर-कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.