सातारा : येथील नगरवाचनालयात राजर्षी शाहु महाराज यांची १५१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक तथा संचालक डॉ.राजेंद्र माने, ज्येष्ठ वक्ते प्रा. श्रीधर साळुंखे,कविवर्य प्रदीप कांबळे,बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर,ग्रंथपाल रुपाली मुळे, कर्मचारीवृंद,वाचक व शाहूप्रेमी उपस्थीत होते.विष्णू धावडे यांनी प्रास्ताविक केले. दळवी यांनी आभार मानले.