कुणाल पाटील युवा सामाजिकतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

0
oppo_0

उरण दि २८(विठ्ठल ममताबादे ) : सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी विविध शाळांना, शैक्षणिक संस्थांना, महाविद्यालयांना मोठया प्रमाणात शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सामाजिक बांधिलकी जपत कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील इयत्ता ५ वी ते १० वी त शिकत असलेल्या प्राथमिक शाळेत तसेच ११ वी व १२वीत शिकणाऱ्या फुंडे महाविद्यालयात एकूण ३००० हुन अधिक वह्यांचे वाटप करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर फुंडे प्राथमिक शाळेच्या सभागृहात वह्या वाटपचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर,सरपंच कुणाल अरुण पाटील, शिवसेना नेते कमळाकर पाटील ,फुंडे हायस्कुल चेअरमन कृष्णाजी कडू,फुंडे हायस्कुलचे प्राचार्य साळुंखे बी. बी, शिक्षक प्रविण, उपशाखाप्रमुख महेश पाटील ,विनय पाटील,हृषिकेश म्हात्रे,अमित पाटील जॊतॆश तांडेल,रोशन म्हात्रे,सुरेंद्र पाटील,प्रथम तांडेल,प्रणय पाटील यांच्यासह शाळेच्या पर्यवेक्षिका बाबर एस. एम, पाटील एस. एस, शिक्षक पाटील एच. एन, शिक्षक पाटील.डी. डी,शिक्षक म्हात्रे ए. आर,उपशिक्षिका पाटील एस. व्ही तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक एच एन पाटील यांनी केले तर प्रस्तावना साळुंके बी बी यांनी केले. प्रस्तावनेत प्राचार्य साळुंके यांनी कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा पुरेपूर वापर करून चांगले शिक्षण घेऊन प्रगती करण्याचा सल्ला दिला.

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी पूर्वीचे शिक्षण कशा पद्धतीचे होते शिक्षण व्यवस्था कशी होती हे सांगितले. हे सांगत असतानाच कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था ही दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करते. गोर गरीब मुलांना आधार देते. गोर गरीब मुलांचे शिक्षण कुठेही अडू नये. विद्यार्थ्यांनी चांगली प्रगती करावी हा दृष्टीकोण ठेऊन शैक्षणिक साहित्य वाटपचा हा कार्यक्रम खूपच स्तुत्य आहे. अशा शब्दात त्यांनी सरपंच कुणाल पाटील व संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे कौतुक केले.जर हुशार व गुणवंत विद्यार्थी असेल व त्याची घरची परिस्थिती खराब असेल तर त्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी येऊन मला भेटावे त्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च मी स्वतः करेन. असेही आश्वासन माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी उपस्थितांना दिले. शेवटी कार्यक्रमाचे आभार मानून सांगता झाली. शैक्षणिक साहित्य वाटप केल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here