अकोले तालुक्यात रासायनिक खते उपलब्ध ;ग्राहक पंचायतच्या पाठपुराव्याला यश

0

अकोले ( प्रतिनिधी )

अकोले आदिवासी भागातील व परिसरासह खरीप हंगामात अत्यावश्यक युरिया व इतर रासायनिक खतांचा  ऐन पावसाळ्यात  तुटवडा निर्माण झाला असता अकोले तालु‌का ग्राहक पंचायत महाराष्ट्र सह अनेकांनी मागणी केल्याने एकूण बफर साठ्यापैकी निम्मा युरिया खुला करण्यात आला आहे. उर्वरित बफर साठा नियोजनाप्रमाणे पुढील महिन्यात खुला करण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांनी दिली.

      तालुक्यात मंजूर असलेल्या 600 मे‌.टन बफर साठ्यापैकी  298.84 में.टन साठा उपलब्ध झाला आहे. त्या पैकी 50% म्हणजे 150  मे.टन बफर साठा जिल्हाधिकारी यांनी वाटपासाठी मंजूरी दिली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना रासायनिक खते युरिया वाटपास सुरुवात  केली असल्याने तालुक्यातील शेतकरी ग्राहक पंचायतीचे आभार मानत आहे. अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी तक्रार असल्यास अकोले तालुका ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्याशी संपर्क करावा असे निवेदनात म्हटले आहे.

या साठी जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, तालुका अध्यक्ष दत्ता शेणकर, कार्याध्यक्ष महेश नवले, सचिव राम रुद्र, सोमनाथ नवले, सुशांत वाकचौरे, शंकर सदगीर, साहेबराव दातखिळे, गंगाराम धिंदळे‌, मोहन मुंडे, आनंद घाणे, सुरेश गभाले, रामदास पवार, माधवराव तिटमे, भाऊसाहेब वाकचौरे, राजेंद्र घायवट, दत्ता ताजणे, सुनील देशमुख, गणपत थिगळे, राजेंद्र लहामगे, जालिंदर बोडके, रामहारी तिकांडे, भाऊसाहेब गोर्डे,ज्ञानेश पुंडे, प्रमोद मंडलिक रामदास पांडे यांनी प्रयत्न केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here