विष्णुपुरी काळेश्वर कमान ते दशमेश गुरूव्दारा रस्त्याचे कामास सुरुवात..

0

नांदेड -विष्णुपुरी येथील मुख्य मार्गावरील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडल्याने ग्रामस्थ सह भाविक भक्तांची गैरसोय झाली होती, अखेर नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आ.आनंदराव पाटील बोंढारकर व माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांनी या संदर्भात बांधकाम विभाग व संबंधित गुत्तेदाराची कान ऊघडणी केल्यानंतर रस्त्याच्या कामाला  28 जुनं पासून प्रांरभ झाला असुन श्रावण महिन्यात होणारी भाविक भक्तांची या रस्त्यामुळे गैरसोय होऊ नये  याची दक्षता घेऊन कामास सुरुवात करण्यात आली आहे.

   विष्णुपुरी काळेश्वर कमान ते दशमेश गुरूव्दारा पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम  शासनाच्या सिगार निधी अंतर्गत कोट्यवधी निधीतून गेल्या काही महिन्यांपासून सुरूवात होते, काही काळानंतर  उर्वरित निधी अभावी हे काम रखडल्याने मुख्य मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या भाविक भक्तांसह ग्रामस्थ यांना त्रास सहन करावा लागत होता , या मुख्य मार्गावर सिमेंट काँक्रीट रस्त्याचा कडेला दोन्ही बाजूला नाल्या असल्याने संततधार पावसामुळे मात्र ग्रामस्थांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागत होते तर अनेक ठिकाणी रस्ता खोदल्या ने चारचाकी व दुचाकी ॲटोचाल  वाहनधारकांना  नाहक त्रास गेल्या अनेक महिन्यांपासून करावा लागत होता ,याबाबत नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर व माजी  आमदार मोहनराव हंबर्डे यांच्याशी  संपर्क साधुन सदरील रस्त्याच्या काम त्वरित सुरू करावे अशी मागणी केल्यानंतर बांधकाम विभागाचे अभियंता व संबंधित गुंतेदाराला विचारपूस करून तात्काळ रस्त्याचे काम चालू करावे असे खडे बोल सुनावले होते ,प्रारंभ  होणाऱ्या श्रावण महिन्याचा दृष्टीने हा काळेशवर मंदिर कडे जाणारा मुख्य मार्गा असल्याने हे काम तात्काळ चालू करावे हि मागणी लक्षात घेता 28 जुनं रोजी सरपंच प्रतिनिधी राजु हंबर्डे,ऊपसरपंच प्रतिनिधी विश्वनाथ हंबर्डे,जयसिंग हंबर्डे,डि.डी.गिरी,

केरबा लुटे,विश्वनाथ हंबर्डे, मारोती विष्णुपुरीकर,सुजित जोशी,अशोक हंबर्डे, राजेंद्र हंबर्डे, माणिक हंबर्डे, प्रल्हाद सोळुंके, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी राजेश हंबर्डे अभियंता चव्हाण,यांच्या सह ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here