बोहल्यावरी चढली
लग्ना उभी कोवळी
नवरोबांच्या तोंडात
हलू लागली कवळी
अफवेचा वेश घाली
गावभर फिरे टवळी
राख फासायचेजागी
हळद लावलीपिवळी
गो-यापान म्हाता-यां
नवरी चालते सावळी
चार दिवस नांदायचे
असो जराशी बावळी
ते भाकड गाईंचे दूध
दोहू पाहतात गवळी
गाभण म्हशी सोडून
रेड्यांना घेता जवळी
दुस-यांच्या शेतातली
खुणवे कशी हिरवळी
धूप लावा अशाजागी
सुगंध सर्वत्र दरवळी
लग्न मोडते तरुणांचे
बिजवर येई ऐनवेळी
माळा पडे अन्य गळा
असेचं घडते दर वेळी
2
अधिवेशन ..
नेहमीची तीचं प्रथा
बहिष्कृत चहापान
बदलाव नाही मुळी
कसला रे मान पान
तळपत्या तलवारी
सध्यातरी या म्यान
विषय मांडणी करा
असो संपूर्ण ध्यान
अधिवेशन ही संधी
झेपावे उंच विमान
रयत सेवा करताना
ठेंगणे पडे अस्मान
असेअनेक समस्या
उठवावे आता रान
सोडवायचे ते प्रश्न
ठेवावे जरासे भान
बहिष्कार नकोउगा
गोंधळा नसो स्थान
लोकमताचे मंदिरहे
नाही कुणा संस्थान
आशाबध्द नागरिक
ठेवा याचे अवधान
लोकशाही सर्वश्रेष्ठ
हवा सार्थ अभिमान
– हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996.