अंधश्रद्धेचे उच्चाटन होणे गरजेचे आहे : किशोर दरफडे

0

सातारा/अनिल वीर : समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी व्यसन, अज्ञान,विषमता,दारिद्र्य व अंधश्रद्धा अडसर ठरत आहेत. अंधश्रद्धा तर समाजास लागलेली कीड आहे.तेव्हा तिचे समूळ उच्चाटन होणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेचे किशोर दरफडे यांनी केले.

           भारतीय बौद्ध महासभा व बौद्ध विकास सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने निवडे,ता.पाटण येथे वर्षावास कार्यक्रम संपन्न झाला.तेव्हा किशोर दरफडे यांनी “अंधश्रद्धा निर्मूलन व बुवाबाजी” या विषयावर मार्गदर्शन करीत होते.त्यांनी अनेक जादूचे प्रयोग करून श्रोत्यांना सत्यता पटवून दिली. 

     यावेळी भानुदास सावंत, बाजीराव न्यायनीत, मधुकर जगधनी, बौध्दाचार्य आनंदा भंडारे, विजय भंडारे,भिमराव सप्रे ,फौजी रामभाऊ भंडारे, बाबासाहेब कांबळे, काशिनाथ भंडारे, राजेंद्र सावंत, उत्तम सावंत, संजय सावंत, नवनाथ सावंत,ओमकार सावंत, तारळे भागातील सर्व पदाधिकारी, उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.

फोटो : किशोर दरफडे जादूचे प्रयोग करीत असताना समोर उपासक-उपासिका.(छाया-अनिल वीर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here