अध्यापकाची जागा कोण्हीही घेऊ शकत नाही : मुजावर-यादव

0

सातारा/अनिल वीर : शिक्षक हा समाजपटलावरील तारा आहे. समाजात विविध घटक कार्यरत आहेत.मात्र,अध्यापकाची जागा कोण्हीही घेवू शकत नाही. असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर व डॉ.सुवर्णा यादव यांनी केले.

     जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ, महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळ व महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय एक दिवसीय हिंदी संगोष्ठी येथील राष्ट्र्रभाषा भवनात आयोजित करण्यात आली होती.तेव्हा समारोपप्रसंगी जिल्ह्य परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होत्या. कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.सुवर्णा यादव अध्यक्षस्थानी होत्या.

      प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर म्हणाल्या, “अध्यापक मंडळ,माता-पिता असे एकूणच हिंदीशी नाळ माझी सर्व स्तरावर आहे.त्यामुळे कायमच हिंदी परिवारात आहे. कोरोना काळात हिंदी अध्यापकांसह सर्व शिक्षण क्षेत्रातील शाळा – शिक्षक यांनी अतुलनीय असे कार्य केलेले आहे. अध्यापकांनी भाषा वापरली तर आपसुकच अध्ययनार्थी अनुकरण करतील.हिंदी कार्यात राज्यात जिल्हा अध्यापक मंडळ नंबर एक आहे.शिक्षणाबरोबर मूल्येही जोपासली पाहिजेत.

     डॉ.सुवर्णा यादव म्हणाल्या, मानवाचे वर्तन आणि मानक वर्तनी यांना संबंध जोडावा असे वाटते.वर्तन हे परिवर्तनशील व आधुनिक व विज्ञाणावर आधारित असावे.एकसूत्रतेसाठी हिंदीप्रेमींनी एक झाले पाहिजे. देशात हिंदीचे योगदान आहे. संत-महात्म्य यांनीही योगदान दिले आहे.

      यावेळी  डॉ. गजानन भोसले,महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी,दयानंद तिवारी आदींनीही आपापल्या सत्रात अभ्यासपूर्ण माहिती कथन केली. डॉ. शोभा पाटील यांनी स्लाईड-शोच्या माध्यमातून स्पष्टीकरण केले.अध्यापक – अध्यापिका यांनी आलेख वाचन केले. यावेळी हिंदी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष अभिलाष अवस्थी,डॉ. सिराज शेख आदींच्या प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांचा गौरव व कोरोना योध्दा म्हणून शिक्षण क्षेत्रात गौरवशाली योगदान देणाऱ्या हिंदी शिक्षकांचा गौरव करण्यात आला. जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष ता.का.सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. विजयकुमार पिसाळ,संजय शिंदे,विनायक बगाडे,सौ.उज्वला मोरे व गोरख रुपनवर यांनी सूत्रसंचालन केले.सदरच्या कार्यक्रमास सुधाकर माने, शहानवाज मुजावर,अ.तु. पाटील,संजय गावडे,शिवाजी कोकाटे,पंडित माने,नारायन शिंदे,पतसंस्थेचे चेअरमन हणमंत सूर्यवंशी व संचालक,व्यवस्थापक नवनाथ शिंदे व सहकारी,सुनंदा शिवदास,मारुती शिवदास, राजेश टागोर,दीपक सूर्यवंशी, महाळाप्पा शिंदे,अनंत यादव, रवींद्र बागडी, रामानंद पुजारी, पंडित माने, प्रज्ञा एडके, प्रशांत चोरगे,इकबाल मुल्ला,परिक्षामंत्री शिवाजीराव खामकर, राजाराम तपळे, शिवाजीराव कोकाटे,  पिलगर,मच्छिन्द्र भिसे,चंद्रकांत तोरडमल,भवनचे सचिव श्रीकांत लावंड,वाचनालयाचे सचिव गुलाब पठाण,नवनाथ कदम, डूबल आदी कार्यकारिणी सदस्य, सर्व विभागीय पदाधिकारी, कर्मचारी, जिल्ह्यातील अध्यापक – अध्यापिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.

फोटो : डॉ.सुवर्णा यादव यांचा सत्कार करताना शहानवाज मुजावर,शेजारी शबनम मुजावर, डॉ.तिवारी व मान्यवर.(छाया-अनिल वीर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here