कोळपेवाडी वार्ताहर :- आजच्या युगात ज्याच्याकडे गुणवत्ता आहे त्यालाच मागणी आहे मात्र केवळ गुणवत्ता असून उपयोग नाही तर गुणवत्ते बरोबर मिळालेले काम मनापासून करण्याची मानसिकता देखील अत्यंत महत्वाची आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल कोणते काम लहान, कोणते काम मोठे याचा विचार करू नका. यशस्वी होण्यासाठी मिळालेली जबाबदारी मनापासून पार पाडा असा मौलिक सल्ला आ. आशुतोष काळे यांनी ‘दीक्षांत समारंभ’ प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
<p>औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोपरगाव व श्री चक्रधर स्वामी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचा ‘दीक्षांत समारंभ’ नुकताच आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी त्यांच्या हस्ते उत्तीर्ण विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीसाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी ४ कोटी ६५ लाख निधी दिला. मात्र २०१४ पर्यंत काम पूर्ण झाले नाही. २०१४ ते २०१९ या पाच वर्षाच्या काळात या इमारतीकडे कुणी ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेवून २०१९ ला निवडून आल्यापासून या इमारतींच्या उर्वरित कामासाठी निधी मिळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून २ कोटी ६८ लाख निधी आणला त्यापैकी १ कोटी ६० लाख रुपयांचे काम पूर्ण झाले आहे. अजूनही १ कोटी ८ लाखाचे रस्ते, पेव्हिंग ब्लॉक व इतर सुविधाचे काम देखील लवकरच पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा विज पुरवठ्याच्या अडचणी सोडवूण नवीन कोर्स सुरु करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.
<p>यावेळी संजय भन्साळी, हिरालाल महानुभाव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे, प्राचार्य शिवकुमार जुमनाके, प्राचार्य चेतन गाढवे, प्राध्यापक बाळासाहेब शिंदे, राजेंद्र आचारी, पोपटराव जाधव, सुनील आव्हाड, मनोज डोखे, राजेंद्र चव्हाण, अण्णासाहेब निळे, सतीश भालेराव, सुरेश दिघाडे, विजय घोगरे, राजेंद्र पानगव्हाणे, अशोक केकाण, पंकज राऊत, अक्षय महाले, सुमित सिनगर, अनिल जाधव, रविंद्र घोरपडे, माजी नगरसेवक रमेश गवळी, फकीर कुरेशी, चंद्रशेखर म्हस्के, राजेंद्र खैरनार, सोमनाथ आढाव, शैलेश साबळे, चांदभाई पठाण, सचिन गवारे, किशोर डोखे, किरण बागुल, बाळासाहेब दहे, विलास पाटोळे, राजेंद्र नेवगे, मंगेश देशमुख आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो ओळ – औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोपरगाव श्री चक्रधर स्वामी औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या ‘दीक्षांत समारंभ’ प्रसंगी आ. आशुतोष काळे समवेत मान्यवर.