उत्कृष्ट कामगिरीबद्दल ग्रामस्थांकडुन सहाय्यक पोलीस निरीक्षक नागरगोजे यांचा सत्कार

0

पैठण,दिं.११: पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे हे रुजु झाल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरी, खुन अशा विविध गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा उलगडा करुन आरोपींना पिंजऱ्यात डांबून चोखपणे कर्तव्य बजावत समाजात एक आगळी वेगळी छाप पाडली. यामुळे गुन्हेगारीला आळा बसला. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पैठण तालुक्यातील टाकळी येथे मंगळवारी (दि.११) एमआयडीसी पोलिसांचा नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सपोनि नागरगोजे, बिट जमादार कर्तारसिंग सिंघल, कृष्णा उगले, गणेश शर्मा, राहूल महोतमल आदीं पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला

            याप्रसंगी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक नागरगोजे म्हणाले की, सर्वांनी जबाबदारी घेवुन काम करणे गरजेचे आहे. नेहमी चांगले काम करणाऱ्याला साथ द्यावी. शक्यतो वादविवाद टाळावा. भांडणामुळे कधीच कुणाचं चांगले झाले नाही. वादविवाद टाळून एक विचाराने मार्ग काढावा. कौटुंबिक प्रगती बरोबर सामाजिक प्रगतीसाठी प्रत्येकाने आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही असे वागले पाहिजे. त्याचबरोबर आपल्या मुलांना चांगले शिक्षण व संस्कार द्या. स्वच्छता राखा, रोगराई टाळा असा मौलिक सल्ला देखील त्यांनी दिला. शेवटी सत्काराबद्दल ग्रामस्थांचे आभार मानत यापुढेही चांगली सेवा देण्यासाठी जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.

                 याप्रसंगी संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक विजय गोरे,  गंगाधर जाधव, सिताराम सोलाटे, विठ्ठल सोलाटे, भानुदास लाटे, शेषराव सोलाटे, गोपीचंद लाटे, निजाम शेख, बबन लाटे, रामराव वाघमारे, कल्याण भालेकर, एकनाथ लाटे, सदाशिव काळे, सिताराम मावस, पांडुरंग सोलाटे, म्हसु जाधव, अशोक गोरे, सरपंच महेश सोलाटे, माजी उपसरपंच कडुबाळ सुसे, उपसरपंच आप्पासाहेब जाधव, ग्रामपंचायत सदस्य रमेश जामदार, अशोक लाटे, रघुनाथ जाधव,  चंद्रहार लाटे, आसाराम ठोंबरे, आत्माराम सोलाटे, नारायण काळे, बबन निळ, भानुदास काळे, शिवनाथ जाधव, लक्ष्मण ठोंबरे, नितीन जाधव, अशोक जामदार, ज्ञानेश्वर बोंबले, भाऊसाहेब नरवडे, गोरख जाधव, लेहाज शेख, सिराज सय्यद, अजय भालेकर, योगेश मोहिते, योगेश सोलाटे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक कडुबाळ सुसे यांनी परीश्रम घेतले.

———-

फोटो : उत्कृष्ट कामगिरीबद्दल ग्रामस्थांकडुन एम आय डी सी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागरगोजे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.(छायाचित्र : विनायक मोकासे, पैठण)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here