सातारा : कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध झाल्याने आपला कलाविष्कार दाखविण्याचे दालन खुले झाले आहे.असे प्रतिपादन शिरीष चिटणीस यांनी व्यक्त केले.
गीत गायन व कविता गायन स्पर्धा लोकमंगल हायस्कूल, नागेवाडी -कुशी या विद्यालयात स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.तेव्हा लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष शिरीष चिटणीस मार्गदर्शन करीत होते.प्रमुख अतिथी म्हणून प्रभा सोनावणे, वर्षा कुलकर्णी,वासंती वैद्य व अंजली मैत्रे (पुणे) या उपस्थित होत्या.
शिरीष चिटणीस यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना गायन कलेसाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे असे स्पष्ट करीत गायनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विकास होण्यासाठी मदत होते. ही स्पर्धा त्यांच्या भावी जीवनात नक्कीच उपयोगी पडेल. असेही त्यांनी विविध उदाहरणाद्वारे सांगितले. काव्या गायनामुळे आनेक बालपणीच्या आठवणीना उजळा मिळतो.
यावेळी कवीच्या कविताचे वाचन झाले.वर्षा कुलकर्णी यांनी विद्यलयातील विद्यार्थ्यांचे कौतुक केले.मुलांनी गायलेल्या गीतामधील ताल,सुराचे कौतुक केले. य स्पर्धामध्ये ग्रामीण कला यांचा प्रभाव दिसून आला. पोवाडा,अंभग,व गणपती गीत या गीताघा समावेश होता. स्पर्धामध्ये शिवरायांचा पोवाडा यास प्रथम क्रमांक मिळाला. हा पोवाडा रूपेश सावंत आणि सहकारी यांनी गायला. दुसरा क्रमांक शंकराला माझ्या या अंभगाला मिळाला.हा अंभग हरीश गोडसे यांनी गायला.तिसरा क्रमांक हिरकणी पोवाडा याला मिळाला.हा पोवाडा गायला होता श्रेया सावंत व सहकारी तर चौथ्या क्रमांकावर होती गवळण ही गायली होती जागृती सावंत हिने यमुनेच्या तिरी…..
या प्रसंगी तबलावादक विद्यालयातील उपशिक्षक सावंत यांना पेटीची साथ महामुलकर यांनी दिली.याप्रसंगी मुख्यध्यापिका व्ही.ए. बाबर, शिक्षक ,शिक्षकेत्तर-कर्मचारी व अध्ययनार्थी उपस्थित होते.
फोटो : मार्गदर्शन करताना शिरीष चिटणीस शेजारी मान्यवर.(छाया-अनिल वीर)